ताज्या घडामोडी

 

एकनाथ भालेराव

*संस्थापक अध्यक्ष*
लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद
*- १ नोव्हेंबर वर्धापन दिन -*

– राजकारणाच्या सारी पिठा साठी नव्हे तर ? बहुजनांच्या हक्कासाठी उभी आहे समता परीषद.

– सर्वं समावेशक जाती धर्मांसाठी ओ.बी.सी चं कवचकुंडल असलेले छगनरावजी भुजबळ साहेब यांनी समता परीषद ही देशव्यापी चळवळ स्थापण करुन सर्व समाज्याला एका छञाखाली घेवुन मनुंचा समुळ नाश करण्यासाठी उभारलेली ही चळवळ.

– समता परीषद ही स्थापने वेळी हि चळवळ एक छोटसं रोपटं होतं,आता माञ समता परीषद अनुभवानं,वयानं,कर्तुत्वानं आणि मुख्य नेञुत्वानं महावटव्रुक्ष झालीय.

– लोकनेते छगनरावजी भुजबळ साहेब हे नाव म्हणजे देशाच्या राजकारणातिल दिग्गज नाव परंतु,ह्या नावाला दोन बाजु ? एक म्हणजे अखिल भारतिय महात्मा फुले समता परीषद आणि दुसरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ? हे नाव तब्बल दोन दशकं शिवसेना पक्षात कार्यकर्ता,नगरसेवक,महापौर,आमदार, विरोधी पक्षनेता असा राजकीय प्रवास केल्या नंतर छगनरावजी भुजबळ साहेब यांनी १९९१ साली स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडले, कसली ही पर्वा न करता.

– छञपती,फुले,शाहु,आंबेडकर ह्या पुरोगामी विचारांची चळवळ ही समतेच्या आधारावर आजवर परीपक्व झालेली आहे.

– ओ.बी.सी बहुजनांच्या लाख मोलाच्या महत्वपुर्ण मागण्यांसाठी छगन भुजबळ ह्या वादळाने आवाज उठवला पण ? शिवसेनेतुन मंडल आयोगाला थारा भेटला नाही त्यानंतर झालेल्या टोकाच्या मतभेदा नंतर हे वादळ आपल्या बाहुबली नेञुत्वा सोबत आपल्या दोन्ही बाजु सहित महाराष्ट्रा समोर उभं राहिलं तर कसं…? एक निर्भय वादळ होऊन तेही एका नाण्याच्या दोन पैलुं सोबत.

– तो पर्यंत ते हे वादळ माळी समाजातून आलेले आहेत,याची कधी विशेष चर्चा झाली नाही, पण कालांतराने ह्या नेत्याला माळी समाजाचा नेता असं उद्देशले गेले असो !

– छगन भुजबळ हे कुणा एका जातीचे स्थान नसून,येथे असंख्य जाती धर्माचे उर्जा स्थान आहे.

– महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक नेते झाले आणि होतील देखिल,पण ? स्व:कर्तुत्वाने पुढं आलेल्या पैकी हे एकमेव.

– पुर्वींची शिवसेना ही निष्ठावंतांवर उभी असलेला पक्ष,त्यावेळी स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या दृष्टीने जातीय समीकरणं महत्त्वाची नव्हती.

– खरंतर शिवसेने ला मुंबई बाहेर मोठ्या प्रमाणात वाढवलं ते भुजबळ व राणे ह्या दोन्ही कट्टर शिवसैनिकांनी हेच वादळ पुढे काँग्रेस मध्ये आले आणि त्यांनी ओ.बी.सी समाजाची पोकळी भरून काढली.

– ओ.बी.सी बहुजनांच्या प्रलंबित मागण्यांसाठी १९९२ साली शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनातुन छगनरावजी भुजबळ साहेब यांनी समता परिषदेची स्थापना केली,तिला जपलं आणि वाढवलही !

– छञपती,फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांची कास धरुन हा नेता रणझुंजार झाला व बहुजनांच्या कामी आला व उध्दारासाठी पुढं सरसावला.

– मुंबई हून येवल्या ला जाणं ? आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना होणं या दोन्ही गोष्टी भुजबळ साहेबांच्या नव्या राजकारणा साठी महत्वपुर्ण बाजु ठरल्या,पण तरी ही भुजबळ साहेबांनी स्वत:ला कधी ओ.बी.सी.चा नेता म्हणून मिरवले नाही ? तर ओ.बी.सी चा नेता म्हणुन त्यांना ओ.बी.सी-बहुजन लोकांनी आपल्या ह्रदय्-यात स्थानापन्न केलं, लोकनेते बहुजन नायक ही पदवी तमाम दीन-दुबळ्या गोर-गरीब जनतेनं त्यांना बहाल केली.

– राजकारणात व समाजकारणात ते प्रभावी ठरले इतक्या वरचं हे नेञुत्व थांबलं नाही,तर ? पुढे येवला मतदार संघ पसंद करुन यांनी येवल्या सारख्या तालुक्याचं नंदनवन केलं व महाराष्ट्राला हेवा वाटावा असा येवला तालुका सुसज्ज केला,आता ते येवला मतदार संघातुन सलग चौथ्यांदा विधानसभा आमदार आहे.

– अखिल भारतिय महात्मा फुले समता परीषदे चा एकमेव उद्देश म्हणजे छञपती,फुले,शाहु,आंबेडकर यांच्या विचारांचा झपाट्याने महाराष्ट्र राज्यात प्रचार व प्रसार करणं होतं व संघटने पासुन दुरावलेल्या समाज्याला एका छञाखाली घेवुन हा आपला महाराष्ट्र पुरोगामी विचारांनी जोडणं हा मुख्य अजेंडा होता समतेचा !

– भुजबळ साहेबांचे जहाल विचार व धाडसी विधाने महाराष्ट्रभर वादळा प्रमाने प्रभावित करुन गेली,तरुणांना तर छगन भुजबळ हा तेव्हाचा शिवसैनिक तरुण धाडसी विधानांमुळे प्रभावित करुन गेला.

– भुजबळ साहेबांना राजकिय नेत्यां पेक्षा सर्वसामान्य जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला,याचे जातिवंत ज्वलंत आणि धगधगते मेळावे म्हणजे आंध्रप्रदेश,राजस्थान,बिहार,
महाराष्ट्र ह्या राज्यातिल तेथिल प्रचंड मोठा भव्य समता प्रलय.

– फक्त एकचं राज्य न गाजवता त्यांनी अजुनही इतरही बलशाली असलेली राज्य गाजवली आंध्र व बिहार येथिल मेळाव्यातिल गर्दीचा जनसागर बघुन सर्वचं चक्रावुन गेले होते.

– दिल्लीचं शक्तिप्रर्शन देखिल समर्थक व विरोधक यांच्या भुवया उच्चवनारं ठरलं,कारण दिल्लीत शक्तिप्रदर्शन करणं हे बोटावर मोजण्या इतक्या लोकांना आजवर शक्य झालेलं आहे.

– ह्या बहुजननायक नेत्याने स्व:ताची ओळखं ही स्व:ता तयार केली,असे भुजबळ साहेब आपल्याला सहजासहजी मिळाले नाही तर ? कधी परीस्थितीने तर कधी विरोधकांनी त्यांच्यावर हल्ले केले व आज देखिल करत आहे पण ? हे वादळ न क्षमणारं आहे कित्तेक वेळा ह्या वादळावर हल्ला झाला व त्या प्रत्येक हल्यात जनतेच्या आशीर्वांदाने हे वादळ सुखरुप बाहेर परतलं,आणि उमेदीने जनेतेचे मनं जिंकू लागले.

– कदाचित नियतीला ही हे मान्य आहे की छगन भुजबळ म्हणजे सच्चा बहुजननायक एक देश पातळी वरील लोकनेता.

– भुजबळ साहेबांनी हार कधीचं मानली नाही,आणि हेच प्रभावी आत्मविश्वास असलेलं एकमेव नेञुत्व गुण,एका समर्थ नेत्याचं वैभव आहे.

– मनुवाद्यांनी पञाव्दारे साहेबांना धमकावले होते ? हे वादळ धमकी,आरोप,षडयंञ ह्या असल्या तथ्य नसलेल्या गोष्टींना घाबरुन मागे सरसावणारं नव्हे, तर त्या मनुग्रंथाची होळी करणारं धाडस आहे.

– हे वादळ पाय जमिनीवर रोवुन संकटांचा कणखर निर्भीड पणे सामना करणारं वादळी नेञुत्व आहे,म्हणुनचं हेचं ते एकमेव ओ.बी.सी बहुजनाचं कवचकुंडल आहे.

– सर्वचं जाती धर्मांना पुरोगामी विचारांच्या खुल्या व्यासपिठावर एकञ करुन,ही समतेच्या विचारांची चळवळ अखंड पणे महात्मा फुले व साविञीबाई फुले यांच्या विचारांनी भविष्यातही चालत राहील.

– सामान्य माणसांसाठी दुर्लक्षित समाज्यासाठी लढणारे एक असामान्य व्यक्तिमत्व केवळ आपल्या कर्मांने त्यांना महात्मा ही पदवी मिळाली,असे क्रांतिसुर्य कुटूंबांच्या विचारावर चालणारी चळवळीचे संस्थापक अध्यक्ष छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या मार्गदर्शनातुन समता परीषद आज आपल्या २८ व्या वर्षात प्रदार्पन करत आहे,त्या निमित्ताने आज हा १ नोव्हेंबर वर्धापन दिन मनपुर्वक शुभेच्छा !

✍✍
कमलेश पैठणकर
(वादळी प्रवास)
७५०७८६८४३२

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close