ताज्या घडामोडी

गलीत गात्रांना अस्वस्थ करीत प्रेरणा देणारा झंझावात! ,,,,,,, ऐन, पी,जाधव,,डेप्युटी,कलेक्टर

सत्य घटनेवर आधारित ,उतरंड चित्रपट

गलीत गात्रांना अस्वस्थ करीत प्रेरणा देणारा झंझावात! ,,,,,,, ऐन, पी,जाधव,,डेप्युटी,कलेक्टर

सत्य घटनेवर आधारित ,उतरंड चित्रपट

उतरंड हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट निर्माण करतांना डायरेक्टर,सुदामजी वाघमारे यांनी अनेक अडचणी आल्या परंतु ,आंबेडकरी विचारापुढे अडचण धुडकवण्यात त्यांना यश आले, हा चित्रपट पहिल्या वर ,डेप्युटी कलेक्टर यांनी सुदामजी वाघमारे यांना
केलेल्या वेक्त भावना
“माझे उरलेले आयुष्य व माझ्या अंगी असलेले सर्व सामर्थ्य मी खेड्यापाड्यातील अस्पृश्य जनतेची सर्वांगीण सुधारणा करण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे.”
हे डॉ बासाहेबांचे आग्रा येथील भाषणातील वाक्य!

आणि तुमच्या *उतरंड* चित्रपटात वैशाली या (मुलीच्या) तोंडी आलेले वाक्य *”आई आपण हे गाव सोडून शहरात जाऊ आणि तेथे मोलमजुरी करु. या गावातील लोकांशी रोजच्या भांडण तंट्यातून सुटका होईल.”
हे संवाद ऐकताना बाबासाहेबांच्या वरील 18 मार्च 1956 च्या भाषणाची आठवण झाल्या खेरीज राहत नाही.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भाषणात म्हणाले होते की,
“जो पर्यंत ते खेडी सोडून शहरात राहायला येणार नाहीत तो पर्यंत त्यांच्या जीवनस्थितीत सुधारणा होणार नाही. आमच्या खेड्यातून राहाणा-या या अस्पृश्यांना वाडवडिलांच्या गावी राहाण्याचा मोह सुटत नाही. त्यांना वाटते तेथे आपली भाकरी आहे. परंतु भाकरीपेक्षा स्वाभिमानाला अधिक महत्त्व आहे. ज्या गावी त्यांना कुत्र्यासारखे वागवले जाते, ज्या ठिकाणी त्यांचा पदोपदी मानभंग होतो, जेथे त्यांना अपमानाचे स्वाभिमानशून्य जीवन जगावे लागते ते गाव काय कामाचे ! खेडेगावातील या अस्पृश्यांनी तेथून निघून जेथे कोठे पडीत जमीन असेल ती ताब्यात घेऊन त्यावर मालकी दाखवावी. जर कोणी जमीन ताब्यात घेताना अडवले तर त्यांना स्पष्ट सांगावे की, आम्ही जमीन सोडणार नाही, परंतु योग्य तो शेतसारा सरकारला द्यावयाला तयार आहोत आणि नवीन गावे बसवून स्वाभिमानपूर्ण माणुसकीचे जीवन जगावे. तेथे नवा समाज निर्माण करावा. तेथील सर्व कामे त्यांनीच करावी. अशा गावातून त्यांना कोणी अस्पृश्य म्हणून अपमानास्पद वागणूक देणार नाही. माझी प्रकृती ठीक होताच मी स्वतः अस्पृश्यांनी पडीत जमीन ताब्यात घेण्याची चळवळ चालविणार आहे.”*
बाबासाहेब आंबेडकर यांच्या वरील दिशा निर्देशानुसार आंबेडकरी चळवळ निर्माणच झाली नाही.
सुदाम जी, आपल्या चित्रपटातून “जातीअंताच्या चळवळीला” प्रेरणा मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
चित्रपटात शेवटी न्यायाधीशासमोर सज्जन चा (तुमचा) संवाद खूपच प्रभावी झालेला आहे. ज्यात *”संविधानाप्रमाणे सामाजिक समता निर्माण करावी. तरच जातीय विषमतेची दरी दूर होऊन खालच्या जातीच्या लोकांना न्याय मिळेल.*” हा संवाद ह्रदयाला भिडणारा आहे.
*हा चित्रपट सामाजिक आणि राजकीयदृष्टीने अत्यंत प्रभावी ठरेल.*
उतरंड हा संपूर्ण सिनेमाच जणू डॉ बाबासाहेबांचे तत्वज्ञान सांगतो आहे असे जाणवते.
तेव्हा प्रत्येक आंबेडकरी माणसाने बघावा आणि जतन करावा असा हा सिनेमा आहे. *गेल्या शतकात जातीभेद या विषयावर इतका प्रभावी चित्रपट झाला नाही.*
त्या बद्दल लेखक दिग्दर्शक सुदाम वाघमारे यांचे खूप आभार.
सदस्य होऊन चित्रपट बघण्या साठी 8828484446/ 9833777250 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close