ताज्या घडामोडी

बस स्थानक झाले चायनीज कॉर्नर ;कारवाई मात्र फक्त कागदोपत्री

बस स्थानक झाले चायनीज कॉर्नर ;कारवाई मात्र फक्त कागदोपत्री

कर्जत :

विजय डेरवणकर

 

कर्जत चारफाटा येथे दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम खुलेआम उभारतांना दिसत असून फक्त नोटीस पाठविण्याचे काम करीत आहे मात्र कारवाई करतांना आढळून येत नसल्याने अखेर एका पांडू चायनीज कॉर्नर धारकांनी चक्क बस स्थानकावर चायनीज नावाचा फलक लावला असून या संदर्भात पत्रव्यवहार करूनही कारवाई केली जात नाही. नक्की यामागचे कारण काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे .
कर्जत चारफाटा हा शहराला जोडलेले केंद्र स्थान आहे. या केंद्र स्थानावर कृषी विद्यापीठ आहे. त्याठिकाणी अनधिकृत हातगाड्या, हॉटेल, बियर शॉप, रिक्षा स्टॅन्ड, चायनीज कॉर्नर, आईस क्रीम पार्लर, असे अनधिकृत बांधकाम अगदी रातोरात उभारले जात आहे. आणि याबाबत तक्रार करून हि फक्त सार्वजनिक बांधकाम विभाग संबंधित व्यक्तीला आणि ग्रामपंचायतीला नोटीस देऊन कळविले जाते. पण कारवाई काहीच केली जात नाही. ते बांधकाम होऊ पर्यंत फक्त बघ्याची भूमिका घेतली जाते.
तसेच कर्जतमध्ये पर्यटन आणि विश्रांतीसाठी अनेक दिग्ग्ज नेते, कलावंत, धनाढय ये- जा करीत असतात. कर्जतमध्ये येत असताना क्षण भर विश्रांतीसाठी गाड्या या हॉटेलच्या बाहेर कसेही कुठेही पार्क केल्या जातात आणि ट्राफिक जाम होते. मुळात रस्ता अरुंद आहे. ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागते. एखादा रुग्ण अतिगंभीर असल्यास तर त्या रुग्णवाहिकेला रस्ता काढून देण्यासाठी पोलिसांची सिटी वाजून तोंडाला फेस येण्याची वेळ येते. मात्र कर्जतचा विकास होण्यासाठी कोणताच नेता पुढे सरसावत हे अनधिकृत अतिक्रमण केलेले बांधकाम हटविण्यास पुढाकार घेत नाही.
यामध्ये अनेकजण राजकीय पक्षाचे पदाधिकारी आहेत आणि त्यांनीच जागेवर कब्जा केला आहे. नक्की पक्षाचा वापर यासाठी केला जातो का असा प्रश्न प्रवासीधारकांना पडत आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसेचे राज ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यापेक्षा अनेक नेतेंचे फार्महाऊस याच मतदार संघात आहे. कर्जतमध्ये विविध कामांसाठी , मेळावे किंवा आढावा घेण्यासाठी येत असतांना त्यांना चारफाटा वरील अतिक्रमण केलेले बांधकाम का दिसून येत नाही. कि दिसून हि न दिसल्या सारखे कारणे हेच पारदर्शी कारभार आहे का ? सार्वजनिक बांधकाम विभागावर नक्की कोण दबाव टाकत आहे कि अतिक्रमण हटवू शकत नाही. मुखतः जो कोणी पांडू चायनीज कॉर्नर धारक त्याची एवढी हिम्मत कुठून आली कि शासकीय बस स्थानकावर चायनीज फलक लावला. तरीही कारवाई केली जात नाही .
————————————————————–
प्रतिक्रिया :-
शासकीय बस स्थानकावर जो कोणी पांडू आहे त्यांनी ज्याप्रमाणे चायनीज फलक लावले त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. स्वतःच्या हॉटेल ची प्रसिद्धी करण्यासाठी खाजगी फलक लावण्याचा अधिकार कोणी दिला आहे. आणि लवकर ते फलक हटविले नाही तर सार्वजनिक बांधकाम विरोधात कोर्टात केस दाखल करण्यात येईल. या अतिक्रमणामुळे ये-जा करतांना खूप त्रास होते. वेळ आणि पॆसा दोन्ही वाया जाते. एखादा अपघात घडल्यास ज्यांनी ज्यांनी हे अनधिकृत बांधकाम केले आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर मनुष्यहानी वधनाचा गुन्हा नोंद केला जाईल.
————सतीश जाधव (निर्धार संघटना)
—————————————

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close