ताज्या घडामोडी

कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा लढा ;

न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले

“>कर्जत मुरबाड राष्ट्रीय महामार्गासाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचा लढा ;
न्यायालयाचे दरवाजेही ठोठावले

कर्जत : विजय डेरवणकर

कर्जत मुरबाड मार्गे शहापूर या राज्य मार्गाचे रुंदीकरण होऊन आता राष्ट्रीय महामार्ग बनवला जात आहे . सर्वात प्रथम 1968 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यासाठी त्या त्या भागातील जमिनी संपादित केल्या . आणि त्या बदल्यात संबंधित शेतकऱ्यांना मोबदला दिला . मात्र यामध्ये अनेक त्रुटी असल्याचे आता उघड झाले आहे . जमीन एकाची आणि मोबदला दुसऱ्याला असा प्रकार घडला आहे . आता या रस्त्याचे काम एमएसआरडीसी करत आहे त्यामुळे या संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे मोबदल्याची मागणी केली आहे . मात्र एमएसआरडीसी चे म्हणणे आहे कि ते काम त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते त्यामुळे आम्ही जबाबदार नाही तसेच आम्ही मोबदला देण्याचा प्रश्नच नाही ,त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी तथा मोबदल्यासाठी लढा सुरु केला असून न्यायालयाचे दरवाजे सुद्धा ठोठावले आहेत .

सविस्तर वृत्त असे कि 1968 दरम्यान या कर्जत मुरबाड रस्त्याचे काम हाती घेण्यात आले . त्यावेळी रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनी विशिष्ट मोबदला देऊन संपादित करण्यात आल्या . मात्र सर्व्हे करतांना आणि त्याच्या नोंदी करतांना काही चुका झाल्या . ज्या शेतकऱ्याच्या शेतातून रस्ता नेला त्याची नोंद करण्या ऐवजी चुकीची नोंद करून मोबदला दुसऱ्याच शेतकऱ्याला देण्यात आला . तसे लिखित पुरावे सुद्धा या पीडित शेतकऱ्यांनी गोळा केले आहेत . मात्र आता अनेक वर्ष उलटली आणि आता सार्वजनिक बांधकाम विभागाऐवजी एमएसआरडीसी काम करत असल्याने मोबदला देण्यास शेतकऱ्यांना नकार देण्यात येत आहे .

त्यामुळे संजय गजानन म्हसे रा वारे तसेच सुगवे येथील गुणाजी वफारे ,लक्ष्मण वफारे ,विजू पेमारे ,विमल जालन ,संतोष क्षिरसागर ,सुमित वफारे ,नंदू कुसुंगळे आदी संबंधित शेतकऱ्यांनी याबाबत शासन दरबारी लढा सुरु केला आहे .
—————–

प्रतिक्रिया :

आमचा रस्त्याच्या कामाला विरोध नाही परंतु शासनाने सर्व्हे नोंदीत केलेल्या चुका सुधाराव्या आमच्याकडे तसे पुरावे आहेत आणि आमच्या जमीन संपादनाचा मोबदला आम्हाला द्यावा . आम्ही मागण्या करीत असल्याने आमच्यावर जो दबाव टाकला जात आहे हे थांबवावे .

— संजय म्हसे , जमीनमालक ,वारे
——————————–

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close