क्राईममेट्रोसिटी

नाशिक पंचवटीतील भडक दरवाजा नाका येथे आयशर टेम्पोची ट्रकला धडक, व भीषण अपघात

नाशिक प्रतीनीधी कपील कट्यारे

*नाशिक पंचवटीतील भडक दरवाजा नाका येथे आयशर टेम्पोची ट्रकला धडक, व भीषण अपघात* *भडक दरवाजा नाका येथील वाहतूक बेटचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले* नाशिक शहर प्रतिनिधी- कपिल कट्यारे पंचवटी- भडक दरवाजा नाका जवळ आयशर ट्रकचा सोमवारी रात्री भीषण अपघात झाला यात आयशर टेम्पो (MH15 – GV – 9516) हिने वाहतूक बेट तोडून पलीकडील रस्त्यावरुण जाणाऱ्या ट्रकला धडक दिली.यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.सदर परिसरात सतत अपघात घडत असतात.वाहतूक बेटाला दिशादर्शक फलक लावण्यात यावे.अशी मागणी परिसरातील नागरिकांनी पंचवटी महानगरपालिका विभागीय कार्यालय येथे वारंवार तक्रार केलेला आहे.तरीही प्रशासनाने दिशादर्शक फलक बसवलेले नाही.व मनपा पंचवटी विभागीय कार्यालय व बांधकाम विभाग कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही. मनपाने त्वरित दिशादर्शक फलक बसवावे अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.पुढील तपास पंचवटी पोलीस ठाणे करीत आहे. . *प्रतिक्रिया-* भडक दरवाजा नाका वाहतूक बेटा जवळ नेहमी अपघात घडतात असतात. आम्ही सातत्याने वेळोवेळी महापालिकेस या वाहतूक बेटास् दिशादर्शक फलक व रिफ्लेक्टर लावणे याबाबत तक्रार केली आहे. तरीही मनपा अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेतली जात नाही. आता तरी मनपा प्रशासनाने या अपघाताची दखल घेऊन तातडीने उपाययोजना करावीत *हेमंत पाटील (सचिव – भडक दरवाजा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था पंचवटी नाशिक)*

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close