आपला जिल्हा

केशरी रेशन कार्ड धारकांचे स्वस्त धान्य बंद ;

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयामुळे लाभार्थी अडचणीत

केशरी रेशन कार्ड धारकांचे स्वस्त धान्य बंद ;

अन्न नागरी पुरवठा विभागाच्या निर्णयामुळे लाभार्थी अडचणीत

कर्जत : विजय डेरवणकर

अंत्योदय तसेच दारिद्र्य रेषेखालील आणि एपील म्हणजे प्राधान्य गट यातील सर्वच लाभार्थीना स्वस्त धान्य विक्री दुकानात कोरोनाच्या काळात धान्य मिळत असे . मात्र मागील दोन महिन्यांपासून एपील गटातील म्हणजेच केशरी रेशन कार्ड धारकांना ध्यान देणे बंद करण्यात आले आहे . यामुळे या गटातील रेशन कार्ड धारकांची अवस्था दयनीय झाली आहे .

      केशरी रेशन कार्ड धारक जेव्हा स्वस्त धान्य दुकानात जातात तेव्हा मागील दोन महिन्यांपासून मालाचा पुरवठा होत नसल्याचे संबंधित कार्डधारकांना  सांगण्यात येत आहे फक्त अंत्योदय योजनेतील लाभार्त्यांपुरतेच अन्नधान्य वरून पुरविले जात असल्याचे दुकानदारांकडून सांगितले जात आहे .

    कोरोनाच्या काळात भल्याभल्यांची आर्थिक कोंडी होऊन त्यांची घडी विस्कटली आहे . त्यात या केशरी रेशन कार्ड धारकांची अवस्था  काय वेगळी नाही . बंद पडलेले व्यवसाय ,बुडालेला रोजगार ,पगारास होत असलेला विलंब आदी कारणामुळे या प्राधान्य गटातील कुटुंबांची आर्थिक कोंडी झाली आहे . अशा परिस्थितीत अन्न नागरी पुरवठा विभागाने या प्राधान्य गटातील म्हणजे केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य देणे बंद केल्याने या कार्डधारकांना वंचित राहावे लागत आहे . त्यांच्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतांना अडचणी येत आहेत .
————————-

 प्रतिक्रिया :

शासनानानेच केशरी रेशन कार्ड धारकांना धान्य वाटप बंद करण्याचा निर्णय मागील दोन महिन्यांपासून घेतला आहे . त्यामुळे आता फक्त अंत्योदय आणि दारिद्र्य रेषेखालील धारकांना स्वस्त धान्य पुरविले जात आहे .

— मिलिंद तंवर , पुरवठा विभाग ,कर्जत तहसील कार्यालय

—————————

प्रतिक्रीया :

  आम्ही केशरी रेशन कार्ड धारक असलो तरी आम्ही सुद्धा सर्वसामान्य असून आम्हालाही कोरोनाचा फटका बसला असून आमची आर्थिक घडी विस्कटली आहे . परिस्थिती दयनीय आहे . जरी कोरोनाची संख्या कमी झाली असली तसेच सरकारने अनलॉक केले असले तरी आर्थिक घडी पूर्वपदावर येण्यास काही काळ जाईल. त्यामुळे जसे कोरोना काळात जसे धान्य दिले जात होते ते देण्यास पुन्हा सुरु करावे .
—- शशिकांत वाडकर , केशरी रेशन कार्ड धारक , कर्जत
—————————

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close