ताज्या घडामोडी

इस्लामपूर येथील कोरोना रुग्णाच्या मृतदेह विटंबना प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांनी प्रशासनावर ओढले ताशेरे*

*इस्लामपूर येथील कोरोना रुग्णाच्या मृतदेह विटंबना प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोग मुंबई यांनी प्रशासनावर ओढले ताशेरे*

अफरोझ अत्तार

राज्य मानवी हक्क आयोगाचे न्यायाधीश सईद साहेब यांच्या समोर झालेल्या सुनावणीत ,इस्लामपूर येथील कोरोना रुग्णाचा स्मशानभूमीत अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले होते हि बाब ह्यूमन राईट्स असोसिअशन फॉर प्रोटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्वरित याची लेखी तक्रार राज्य मानवी हक्क आयोग मुंबई येथे केली होती याची आयोगाने दखल घेऊन दि २०-१०-२०२० रोजी झालेल्या सुनावणीत इस्लामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी अरविंद माळी साहेब यांनी यासंबधी अहवाल सादर केला यावर आयोगाने इस्लामपूर नगरपालिका प्रशासनावर कडक शब्दात ताशेरे ओढले व सदरची घटना अतिशय गंभीर आहे असे सुनावले तसेच पोलीस प्रशासनाने पुढील तारीख मिळावी अशी विनंती केली
यासंबधी ह्यूमन राईट्स अससोसिअशन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनीही मृतदेह विटंबनाचा अहवाल सादर करून सदरच्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी केली व पुढील सुनावणी२०-११-२०२० होईल

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close