ताज्या घडामोडी

अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे…सुरेश लाड

आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी दिले आदेश

कर्जत – विजय डेरवणकर15 ऑक्टोंबरपासून राज्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यासह , रायगड जिल्यातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे . तयार झालेल्या भाताच्या दाण्यास खाली पडल्यामुळे कोंब फुटले असून कापणी केलेले भात शेतातच कुजले आहे . हजारो एकर मधील भातपिक पूर्णपणे उध्वस्त झाले असून निसर्गाच्या या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे . या अस्मानी संकटामुळे शेतांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला असून त्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळावे अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी नायब तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तर तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या चर्चा करताना जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी नुकसानग्रस्त शेतीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यात येऊन शासनातर्फे मदत करण्यात आली परंतू त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही.तसेच 3 जून ला निसर्ग चक्री वादळामध्ये अनेकांचे फळबागा, घरे पडली, वृक्षांचे जे नुकसान झाले त्या संदर्भात किती निधी आला आणि आता पर्यंत कितीजणांना वाटप केले याचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी घेतला असता तर आतापर्यंत 5 कोटी 55 लाख निधी आला आणि त्यापैकी 5 कोटी 33 लाख नुकसानग्रस्त यांना दिला असून उरवर्तीत लवकर जमा करणार असल्याचे तहसीदार विक्रम देशमुख यांनी माहिती दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड ,माजी सभापती तानाजी चव्हाण, प्रतीक्षा लाड, युवक तालुकाध्यक्ष सागर शेळके, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, अमोघ कुलकर्णी,ऍड प्रतीक्षा लाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळेस शेतकरी वर्गाचे नवरात्र सण तर अतिशय दुःखात गेला तर येणार दसरा आणि दिवाळी तरी साजरा करता आली पाहिजे. मध्येच कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गांवर उपासमारीची वेळ आली त्यात निसर्ग चक्र आणि परतीच्या पावसानं जोरदार दणका दिल्यानंतर आता नुकसानभरपाई कधी मिळणार? याची चिंता बळीराजाला सतावतेय.
वर्षभर शेतात कष्ट केल्यानंतर शेतमाल हाती यायची वेळ आली असताना परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे कोकणामधील प्रमुख पीक भात असल्याने त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्जमाफी नाही आणि त्यामुळे नवं कर्जही मिळत नाही.
——————————-

अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे…सुरेश लाड

माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी दिले आदेश

कर्जत : विजय डेरवणकर

15 ऑक्टोंबरपासून राज्यात पडलेल्या परतीच्या मुसळधार पावसाने कर्जत तालुक्यासह , रायगड जिल्यातील भातशेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे . तयार झालेल्या भाताच्या दाण्यास खाली पडल्यामुळे कोंब फुटले असून कापणी केलेले भात शेतातच कुजले आहे . हजारो एकर मधील भातपिक पूर्णपणे उध्वस्त झाले असून निसर्गाच्या या अवकृपेने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे . या अस्मानी संकटामुळे शेतांसमोर जीवनमरणाचा प्रश्न उभा राहिला असून त्यांना शासनाकडून मदतीचा हात मिळावे अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी नायब तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तर तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या चर्चा करताना जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी नुकसानग्रस्त शेतीचे त्वरीत पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी तसेच सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांचे पंचनामे करण्यात येऊन शासनातर्फे मदत करण्यात आली परंतू त्यापैकी अनेक शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत मदत मिळाली नाही.तसेच 3 जून ला निसर्ग चक्री वादळामध्ये अनेकांचे फळबागा, घरे पडली, वृक्षांचे जे नुकसान झाले त्या संदर्भात किती निधी आला आणि आता पर्यंत कितीजणांना वाटप केले याचा आढावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी घेतला असता तर आतापर्यंत 5 कोटी 55 लाख निधी आला आणि त्यापैकी 5 कोटी 33 लाख नुकसानग्रस्त यांना दिला असून उरवर्तीत लवकर जमा करणार असल्याचे तहसीदार विक्रम देशमुख यांनी माहिती दिली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रायगड जिल्हाध्यक्ष सुरेश लाड ,माजी सभापती तानाजी चव्हाण, प्रतीक्षा लाड, युवक तालुकाध्यक्ष सागर शेळके, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, तालुका अध्यक्ष अशोक भोपतराव, अमोघ कुलकर्णी,ऍड प्रतीक्षा लाड आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळेस शेतकरी वर्गाचे नवरात्र सण तर अतिशय दुःखात गेला तर येणार दसरा आणि दिवाळी तरी साजरा करता आली पाहिजे. मध्येच कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वसामान्य आणि शेतकरी वर्गांवर उपासमारीची वेळ आली त्यात निसर्ग चक्र आणि परतीच्या पावसानं जोरदार दणका दिल्यानंतर आता नुकसानभरपाई कधी मिळणार? याची चिंता बळीराजाला सतावतेय.
वर्षभर शेतात कष्ट केल्यानंतर शेतमाल हाती यायची वेळ आली असताना परतीच्या पावसानं धुमाकूळ घातलाय. त्यामुळे कोकणामधील प्रमुख पीक भात असल्याने त्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. भात पिकाचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कर्जमाफी नाही आणि त्यामुळे नवं कर्जही मिळत नाही.
——————————-
चौकटीतला मजकूर
जे तहसील कार्यालयात वयस्कर, वयोवृद्ध कामानिमित्त येतात त्यांचे त्वरित काम करून दिले पाहिजे. कोरोना सारख्या परिस्थितीत जेष्ठ वयोवृद्धांना तात्काळत ठेवणे हे योग्य नाही.असे ही सुचना यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांनी केले.
——————————

——————————

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close