महाराष्ट्र

झोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी

झोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी

उल्लेखनीय कामगिरी

खालापूर (प्रतिनिधी) समाधान दिसले

सध्याच्या युगात व्यक्तिगत आणि व्यावसायिक पातळीवर निती – अनिती, प्रामाणिकपणा, व्यावसायिकता आणि सामाजिक बांधिलकी या गोष्टी जुन्या जमान्याच्या म्हटल्या जातात. आताचा उद्योग व्यवसाय स्वार्थ, आर्थिक गैरव्यवहार, नफेखोरी, लाचखोरी अशा दुर्गुणांनी बरबटलेला दिसून येतो. अनैतिक आर्थिक व्यवहार आणि नफेखोरी हेच आपल्या देशातील उद्योग जगताचे सर्वसाधारण स्वरूप झाले आहे. सर्वच उद्योगपती आणि उद्योग या रांगेत बसणारे नाहीत. काही मोजके उद्योगपती आणि औद्योगिक घराणी यांच्याबद्दल जनसामान्यांत एक आदराची भावना दिसून येते असून ‘झोराबियन चिक्स’ उद्योगसमूह आणि झोराबियन फॅमिली हे अशाच घराण्यांपैकी एक. झोराबियन कंपनी म्हणजे कारखानदारी बरोबर सामाजिक बांधलकी जपणारी अग्रगण्य कंपनी म्हणून ओळख प्राप्त असल्याने जनमाणसांत या कंपनी व्यवस्थापनाबद्दल आदर युक्य भावना असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतातील उद्योग जगताबद्दल अनेक उदयोगपतीनी केलेल्या काही भ्रष्टाचार प्रकरणांमुळे त्याची वाईट प्रतिमा निर्माण झाली आहे. देशातील अनेक उद्योगपतींबद्दल जनमानसात एक नकारात्मक भावना वाढीस लागली आहे. वास्तविक देशाच्या प्रगतीत आणि औद्योगिकीकरणात उद्योगपतींचे योगदान मोठे असते. रोजगार निर्मिती, देशाचे अर्थकारण आणि औद्योगिक प्रगती यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे. तरीही सर्वसामान्य माणसाच्या मनात त्यांच्याबद्दल आदर कमी आणि अविश्वास जास्त दिसून येत असला तरी काही निवडक उदयोगपती व उदयोगसमुहाबद्दल आदरांची भावना पाहायला मिळत असून अशीच आदरांची भावना खालापूर तालुक्यातील डोळवली येथील झोराबियन चिक्स प्रा.लि.कंपनी बद्दल आहे.

झोराबियन कंपनी कारखानदारी करीत असताना सामाजिक कार्य करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत सर्वसामान्यांना मदतीचा हात देत आहे. या कंपनीच्या सामाजिक बांधिलकीमुळे अनेकांना मोठ्या प्रकारचे साहाय्य मिळत आहे. त्यामुळे या कंपनीच्या कार्याचा सर्वाना कौतुक वाटत आ

या कंपनीच्या माध्यमातून कोरोना महामारीच्या काळात 1000 हून अधिक कुटुंबाना एक महिना पुरेल इतके जीवनावश्यक साहित्याचे वाटप, खालापुर तालुक्यातील 8 हून अधिक ग्रामपंचायतींना सामाजिक कार्य करण्यासाठी आर्थिक साहाय्य, पाणी योजना सुरळीत करण्याकरीता आर्थिक साहाय्य, गावोगावी मंदीराच्या जिर्णोधार व रंगरंगोटीसाठी साहाय्य अशा एक ना अनेक प्रकारची मदत ही कंपनी करीत सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करीत आहे.

या कंपनीच्या पुढील उज्वल सामाजिक कार्याकरीता मनपूर्वक शुभेच्छा

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close