कृषी

खालापूरात खासदार श्रीरंग बारणे थेट शेताच्या बांधावर, भात पिकांच्या नुकसानीची केली पाहणी खालापुर (प्रतिनिधी) समाधान दिसले

 

खालापुर (प्रतिनिधी) समाधान दिसले

खालापुर तालुक्यात अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात भात पिकांचे मोठे नुकसान झाले. याच पार्श्वभूमीवर खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी 18 अॉक्टोबर रोजी प्रत्यक्ष खालापुरात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून तातडीने पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल, कृषी मधील संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिके भुईसपाट झाल्याने शेतकरीअडचणीत आहेत. खालापुर तालुक्यातील बहुतांशी भागात प्रामुख्याने भात पिकाचे अवकाळी पावसाने भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पावसामुळे पिकांच्या नुकसानीची पाहणी खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी शेतात जाऊन घेतली. तर बारणे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट पंचनामे करण्याचे आदेश खासदार बारणेंनी दिले आहेत.

याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, तहसिलदार इरेश चप्पलवाल, नायब तहसिलदार कल्याणी मोहिते, पंचायत समितीचे पोळ, शिवसेना तालुका संपर्कप्रमुख उमेश गावंड, खालापूर शहरप्रमुख पदमाकर पाटील, कृषी आधिकारी अर्चना सुळ, सहाय्यक पुजारी, तलाठी सुर्वणा कोल्हे, आर.बी.कवडे, माधव कावरखे, ढाकणे, अभीजित हिवरकर, युवासेना खालापूर शहर अध्यक्ष नितीन पाटील, उपाध्यक्ष जयेश पाटील, संभाजी पाटील, जनार्दन पाटील, रमेश पाटील, शिवाजी पाटील, चंद्रकांत पाटील, पोलिस पाटील राजू केदार, दत्तात्रेय गणेशकर, दिलीप मनेर, किशोर शपवार, हरिष मोडवे, संदीप पवार, निखिल मिसाळ, राकेश पारठे, पांडुरंग मगर, राजू पारठे, वैभव पारांगे, धनजंय गावंड, पो.पाटील मनोज पारठे, रमेश पारंगे, सुनिल घोसाळकर, शिवाजी पवार, एकनाथ मिसाळ, रमाकांत पारंगे, अशोक तट्टू, गिरीधर पाटील, धनजंय पवार यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थितीत होते.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपले मत मांडताना म्हणाले की, परतीचा पावसाने मोठ्या स्वरूपात यावर्षी हजेरी लावली असुन भात पिकांच्या या काढणीस आलेल्या पिकांचे तालुक्यात सर्वत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काढणीस आलेली हजारो एकर क्षेत्रातील पिके अक्षरशः कुजली आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिकदृष्ट्या अडचणीत आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच घर व इतर मालमत्तांचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या सर्व नुकसानीची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन पंचनामे युद्धपातळीवर करावेत. या नुकसानग्रस्तांना त्वरित आर्थिक मदत द्यावी असे मत खासदार बारणे यांनी व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close