ताज्या घडामोडी

खोपोली शहराचा विकासात्मक कामातुन कायापालट करणार – आमदार महेंद्र थोरवे

जनतेची दुःखे ही माझी दुःख समजून त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी या मतदारसंघाचे आमदार म्हणून मी प्रयत्न करणा

खोपोली शहराचा विकासात्मक कामातुन कायापालट करणार – आमदार महेंद्र थोरवे

खालापुर (प्रतिनिधी) समाधान दिसले

कर्जत – खालापूर विधानसभा मतदारसंघात आलेल्या विविध संकटे मग ती चक्रीवादळ असो, अवकाळी पाऊस, या करोना प्रादुर्भाव परिस्थिती या सर्व संकटातून येथील जनतेला आलेल्या समस्यांचे निराकरण करून त्यांची दुःखे ही माझी दुःख समजून त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी या मतदारसंघाचे आमदार म्हणून मी प्रयत्न करणार तसेच या खोपोलीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांच्या सहकार्यातून प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन कर्जत खालापूर मतदार संघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.

आमदार थोरवे यांच्या प्रयत्नातून नगरपालिका रुग्णालयाला रुग्णवाहिका देण्यात आली
त्याचा लोकार्पण आमदार थोरवे यांच्या हस्ते 16 अॉक्टोबर रोजी संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष सुमन औसरमल, उपनगराध्यक्षा विनिता कांबळे, मुख्याधिकारी गणेश शेटे, गटनेते सुनील पाटील, नगर पालिकेतील सर्व सभापती नगरसेवक, नगरसेविका, शिवसेना सल्लागार मंडळाचे गोविंद बैलमारे, विजय भाऊ पाटील, तालुकाप्रमुख संतोष विचारे याबरोबर शिवसेना नेते पदाधिकारी नगरपालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता वानखेडे त्यांचा सर्व स्टाफ उपस्थित होता.

तर थोरवे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य शासनाचा उपक्रमामुळे करोना प्रार्भावावर नियंत्रण करण्यास राज्य शासनाला यश आले विशेषता डॉक्टर नर्स पुलिस यांचे विशेष कौतुक केले, या शहराचे जे जे प्रश्न असतील ते सर्व शासनाच्या माध्यमातून सोडविणार आणि या शहराला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मी कटिबद्ध असणार आहे. कारखानदारीच्या सीएसआर फंडातून रूग्णालयाला अद्यावत करण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

याच वेळी नगराध्यक्ष सुमन अवसरमल उपनगराध्यक्ष वे
वनिता कांबळे, गटनेते सुनील पाटील यांनी विचार मांडले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी गणेश शेटे यांनी मांडले त्यांनी रुग्णवाहिका रुग्णाला दिल्यामुळे जनसामान्यांची सेवा होणार असल्याने त्यांनी आमदारांचे आभार व्यक्त केले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close