महाराष्ट्र

फायनान्स कंपनीच्या दंडेलशाहीच्या विरोधात कर्जत मनसे आणि नारीशक्ती संघटनेचा एल्गार ; तहसीलकार्यालयावर धडक देत निवेदन केले सादर

नारी शक्ती संघटनेच्या वतीने याविरोधात एल्गार पुकारण्यात आला

फायनान्स कंपनीच्या दंडेलशाहीच्या विरोधात कर्जत मनसे आणि नारीशक्ती संघटनेचा एल्गार ;
तहसीलकार्यालयावर धडक देत निवेदन केले सादर

कर्जत : विजय डेरवणकर

कोरोनामुळे सद्या सर्वांचीच आर्थिक घडी विस्कटली आहे . कुटुंब चालवितांना नाकीनऊ येत आहे . अशा परिस्थितीही असतानाही खाजगी फायनान्स वाले हफ्ते वसुलीसाठी संबंधित कुटुंबियांच्या घरोघरी जाऊन पैसे वसुली साठी दबाव टाकत आहेत . घरातील महिलांना अर्वाचं भाषेत बोलत आहे . हप्ते भरण्यासाठी जवळ पैसे नाहीत थोडे संभाळून घ्या लवकरच पैसे भरतो अशी विनवणी महिलांनी करूनही फायनान्स चे कर्मचारी ऐकत नसून फारच त्रास देतं असल्याने अखेर कर्जत मनसे आणि नारी शक्ती संघटनेच्या वतीने याविरोधात एल्गार पुकारण्यात आला आणि या सर्वानी एकत्र येत तहसीलकार्यालयावर धडक देत यासंबंधी नायब तहसीलदार संजय भालेराव यांच्याकडे निवेदन सादर केले .
कर्ज घेतले म्हणजे हप्ते भरलेच पाहिजेत हि बाब जरी खरी असली तरी अचानक आलेल्या कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात . काहींचा रोजगार बुडालाय . घरकाम करणाऱ्या महिलांना अद्यापि लोक काम करण्यासाठी घरात घेण्यास धजावत आहेत त्यामुळे त्यांनाही काम नाही . व्यवसाय अद्यापि म्हणावे तसे रुळावर आलेले नाहीत . मंदीचं जाणवत आहे . त्यामुळे लगेचच बँकांच्या हप्त्यांसाठी पैसे जमा होत नाहीत . अशीच अवस्था बचत गटांसाठी कर्ज काढलेल्यांची आहे . तरी यासर्व बाबींचा विचार करून शासनाने या अशा बळजबरीने हप्ते वसूल करणाऱ्या बँकांवर अंकुश लावावा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे .
निवेदन सादर करतांना मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील ,नगरसेवक धनंजय दुर्गे ,शहर अध्यक्ष समीर चव्हाण , सचिव चिन्मय बडेकर , उपशहर अध्यक्ष ओंकार मोरे ,कार्याध्यक्ष संदेश काळभोर ,प्रज्योत घोसाळकर , ज्योती जाधव ,स्वीटी बार्शी ,वर्षा डेरवणकर ,सुप्रिया मोरे ,कमल जाधव आदीu
कर्जत खोपोली मनसे आणि नारी शक्ती संघटनेच्या महिलाही उपस्थित होत्या .

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close