ताज्या घडामोडी

खोपोलीतील KMT च्या बसेस त्वरित चालू करा अन्यथा आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा खालापूर (प्रतिनिधी) समाधान दिसले

खोपोलीतील KMT च्या बसेस त्वरित चालू करा अन्यथा आंदोलनाचा वंचित बहुजन आघाडीचा इशारा

खालापूर (प्रतिनिधी) समाधान दिसले

वंचित बहुजन आघाडी खोपोली शिष्टमंडळाने खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी अणि जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली असून. ह्या चर्चेमध्ये
1) वाढीव पाणीपट्टी दर मागे घेण्यात यावे अथवा या आर्थिक वर्षी लागू न करण्याबाबत.

2) नदीच्या पलीकडील भागातील जेष्ठ नागरिकांना सध्याच्या ठिकाणी असलेल्या वाचनालयाकडे ये-जा करण्यास त्रास होतं असून वाचक मंडळींसाठी जागा अथवा पुस्तके उपलब्ध करून देण्यात यावी.

3) सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्र शासनाने बस सेवा चालू करून बाराच काळ होऊन देखील खोपोली नगरपरिषदेच्या माध्यमातून चालत असलेली खाजगी बस सेवा (KMT-सुधीर रोडलाईन्स) अद्याप चालू केली नसल्याने दैनंदिन प्रवास करणाऱ्या सर्व खोपोलीकरांना नाहक त्रास होतं आहे. त्याकरिता बस सेवा त्वरित चालू करावी.

4) बराच काळ होऊन देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे काम अतिशय मंद गतीने होत आहे ते लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे.
अशा प्रमुख मागण्यांसह इतर विषयांवर देखील चर्चा करण्यात आली.

तसेच लवकरात लवकर बस सेवा चालू करण्याची विनंती शहर अध्यक्ष दिपक गायकवाड यांच्याकडून करण्यात आली आहे. अन्यथा वंचित बहुजन आघाडी खोपोलीच्या वतीने शासनाला जागे करण्याकरिता डफली बजाव आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

यावेळी शहर अध्यक्ष दिपक गायकवाड, सरचिटणीस आशिष मणेर, संदीप गाडे, उत्तम पवार, विजय क्षीरसागर, रोहीत वाघमारे, नयन गायकवाड, मनोज पवार, कुणाल पवार, राहुल वाघमारे, भारत गायकवाड, सुमीत जाधव, संजय ओव्हाळ, गणेश बनसोडे, नयनेश गायकवाड, रोहन गायकवाड व अन्य पदाधिकारी अणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close