ताज्या घडामोडी

दलित वस्तीच्या विकासासाठी शिवाजी शिंदेचा पुढाकार

दलित वस्तीच्या विकासासाठी शिवाजी शिंदेचा पुढाकार

दलित वस्तीच्या विकासासाठी शिवाजी शिंदेचा पुढाकार

चंद्रकांत सुतार–माथेरान

 

माथेरान मध्ये आजवरच्या कार्यकाळात अनेक विकास कामे काहीशा प्रमाणात पूर्ण होत असतानाच दलित वस्ती कडे सहसा कुणीही पहात नसून या नागरिकांना भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी सुरुवातीपासून विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदेंनी प्रयत्नशील असून आपल्या परीने ते सातत्याने या वस्तीच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत नुकताच त्यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांना रस्त्याची सोय उपलब्ध करण्यात आली आहे त्यामुळे त्या भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
संत रोहिदास नगर आणि पंचशील नगर या ठिकाणी जाण्यासाठी मागील काळात त्यांनी लोखंडी पुलाचे काम पूर्ण केल्यामुळे हे दोन्ही भाग एकमेकांना जोडले गेले आहेत.
सर्व नागरिकांना ये जा करणे अत्यंत सोयीस्कर झाले आहे. याच ठिकाणी जाण्यासाठी पावसाळ्यात रस्त्याची सुविधा नव्हती.पावसाळ्यात तेथील पायवाटेने ये जा करताना सर्प विंचू याची भीती असे.
त्यावेळी तेथील नागरिकांना ठाऊक होते की आपली समस्या फक्त याच नगरसेवकाच्या माध्यमातून पूर्णत्वास जाऊ शकते त्यामुळेच सर्वांनी याबाबत शिवाजी शिंदेंना सांगितल्यानुसार या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून जे जुने पेव्हर ब्लॉक होते त्याचा उपयोग या ठिकाणी करण्यात आला आहे ह्या रस्ताचे काम दि.९ रोजी पूर्ण करुन नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिला आहे.
तर दलित वस्तीच्या सुधारणेसाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन मागील काळात आलेला निधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परत गेल्यामुळे तो भरीव निधी लवकरच उपलब्ध व्हावा यासाठी संबंधित अधिकारी वर्गाकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे.त्यामुळे लवकरच हा निधी पुन्हा दलित वस्तीच्या सुधारणेसाठी आल्यावर हा संपूर्ण भाग विकसित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. विरोधी पक्षनेते शिवाजी शिंदे या भागासाठी आपला वेळ खर्च करीत असून त्यांच्या सकारात्मक कार्यपद्धतीमुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close