आरोग्य व शिक्षण

यवतमाळ जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यु ; ९६ नव्याने पॉझेटिव्ह: २४ तासात ४४ जण बरे।*

*यवतमाळ जिल्ह्यात चार कोरोनाबाधितांचा मृत्यु ; ९६ नव्याने पॉझेटिव्ह: २४ तासात ४४ जण बरे।*

यवतमाळ:- (प्रतिनिधी/वासीक शेख)

यशतमाळ जिल्ह्यात गत २४ तासात चार कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून ९६ जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटर कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या ४४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे.

मृत झालेल्या चार जणांमध्ये यवतमाळ शहरातील ७४ वर्षीय व तालुक्यातील ७९ वर्षीय पुरुष, तसेच दारव्हा तालुक्यातील ६७ वर्षीय पुरुष व ७५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात सद्यस्थितीत ६११ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ९०१६ झाली आहे. तर आज ४४ जणांना सुटी मिळाल्याने सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७८०८ आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २८८ मृत्युची नोंद आहे.

जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत ७९७९० नमुने पाठविले असून यापैकी ७८८५४ प्राप्त तर ९३६ अप्राप्त आहेत. तसेच ६९८३८नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
सर्व हक्क मुख्य संपादक यांचे कडे असून त्यांच्या परवानगी शिवाय काहीही कॉपी करू नाही.
Close
Close