येवल्यात 22 हजाराचा गुटका व तंबाखू जप्त उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांचे टीमची कामगिरी
येवल्यात 22 हजाराचा गुटका व तंबाखू जप्त
उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांचे टीमची कामगिरी
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती मालेगाव, यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गरजे मनमाड यांच्या टीमच्या प्रमुख उपस्थितीत येवल्यामध्ये छापा टाकून मोठे कारवाई करत अवैध धंदे करण्यासाठी आलेला गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ जप्त करण्यात आला आहे या टीमने एकूण 22 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून आरोपी फिरोज खान पठाण व नवीन अन्सारी त्या लोकांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर कलम 328, 188, 272, 273 व इतर कलमान्वये कारवाई करण्यात आली आहे प्रोबेशनरी उपविभागीय अधिकारी सविता गर्जे यांच्या दबंग कार्यवाहिमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे पुढील तपास गांगुर्डे दादा व शेख दादा करीत आहेत