तडीपार व अट्टल गुन्हेगारास येवला तालुका पोलीसांनी केले जेरबंद अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर अनेक कलमे दाखल
तडीपार व अट्टल गुन्हेगारास येवला तालुका पोलीसांनी केले जेरबंद
अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर अनेक कलमे दाखल
येवला तालुक्यातील अट्टल गुन्हेगार अमोल उर्फ भावड्या दिलीप वाघ रा. राजापुर ता. येवला यास तपास पथकाने वेशांतर करुन मोठ्या शितापीने पकडुन त्यास पोलीस स्टेशनला आणले आहे. त्याने पळवुन नेलेली अल्पवयीन मुलगी हिस देखील पोलीस स्टेशनला आणले
अटक केलेल्या आरोपी विरुध्द येवला तालुका पोलीस स्टेशनला (१) ६०/२० भादवि ३२६, १४३, (२) ५९/२० भादवि ४३६,४५७, (३) १९२/२० भाहकाक ४/२५, (४) ३३० / २१ भादविक १४३,३५२, ५) २६/ २०२२ भाविक ३२४, ३२३, ६) ५०९/२०२२ भादविक ३७९, ७) १०४/२०२३ भादविक ३६३, ८) २९६ / २०२३ भाविक ३२५, ३२४, ३२३, ५०४, ५०६, प्रमाणे गुन्हे दाखल आहे.
सदर आरोपीला एक वर्षाकरीता हद्दपार केले होते. तो परिसरात येऊन अनेक गुन्हे करत होता अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याचा सदर आरोपीवर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये आरोपीचा शोध घेऊन अटक करणे संदर्भात मा. श्री. शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक, नाशिक ग्रामीण, मा. श्री. अनिकेत भारती, अपर पोलीस अधिक्षक, मालेगांव केलेल्या मार्गदर्शक सुचनानुसार येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली आरोपी चाळीसगांव येथे असल्याबाबत माहीती मिळाल्याने ही कार्यवाही केली असुन पुढील कारवाई तपासी अमंलदार सपोनि राजपुत हे करीत आहे.