देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा – जनता दरबारात मंत्री भारती पवार यांना साकडे
देवनाचा सिंचन प्रकल्प मार्गी लावा – जनता दरबारात मंत्री भारती पवार यांना साकडे
सर्व विभागांची मंत्रालयात एकत्रित बैठक लावण्याची जलहक्क संघर्ष समिती ची मागणी
येवला , दिनांक – २० मे २०२३
तालुक्यातील देवदरी येथील प्रस्तावित देवनाचा सिंचन प्रकल्पाचे काम जर २०२४ पूर्वी सुरु करायचे असेल तर सर्व संबधीत खात्यांची मंत्रालयात संयुक्त एकत्रित बैठक लावून एक खिडकी निर्णय घ्यावा ( सिंगल विंडो क्लिअरन्स ) , सर्व संबंधित खात्यांचे कॅबिनेट मंत्री , सचिव ,विभागप्रमुख यांनी एकत्र बसून सर्व प्रकारचे ना हरकतींचे दाखले , मंजुऱ्या एकाच वेळी देऊन प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम कधी सुरु करणार याची तारीख जाहीर करावी अशी आग्रही मागणी जलहक्क संघर्ष समितीच्या वतीने भारम येथील केंद्रीय मंत्र्यांच्या जनता दरबारात केली .
20 जानेवारी 2014 रोजी जलविज्ञान संस्थेचे या प्रकल्पासाठी ६५ दशलक्ष घनफुट (१८४० सहस्त्र घन मिटर) क्षमतेचे प्रमाण पत्र मिळाले आहे , सविस्तर प्रकल्प अहवालास तांत्रिक मान्यता मिळून राज्य शासनाची १२ कोटी ७७ लाख , ३६ हजार १५३ रुपयांची प्रशासकीय मान्यता दिनांक २० जानेवारी २०२१ रोजी मिळाली आहे. मात्र नुसती निविदा प्रक्रिया राबविण्यात २ वर्ष लागली , दरम्यानच्या काळात
देवनाचा सिंचन प्रकल्पासमोरील अडचणीं ची सोडवणूक करणे कामी महाराष्ट्र सरकार चे संबंधित कॅबिनेट मंत्री ,प्रधान सचिव , विभाग प्रमुख व केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालय संबधित विभाग प्रमुख यांची संयुक्त बैठक लावून एक खिडकी योजनेसारखी सर्व अडचणी एकाच बैठकीत मार्गी लावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने जलहक्क संघर्ष समितीचे संयोजक भागवतराव सोनवणे यांनी केली आहे . निवेदनावर कृती समितीचे सचिव जगनराव मोरे ,कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात व इतर ९०० शेतकऱ्यांच्या सह्या व अंगठे आहेत .
या प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी, देवदरी या गावामधील प्रत्यक्ष 358 हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून भारम, कोळम खुर्द, कोळम बु. रेंडाळे या शिवारातील भूजल पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे.कायमच अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे. येवला तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.हा राज्यस्तरीय प्रकल्प असून आजवर २०१२ नंतर च्या सर्व जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषि , वने , पर्यावरण, या अंतर्गत येणाऱ्या विविध विभागातून हा विषय गेला आहे , यापुढेही या विविध खात्यांच्या संयुक्त समन्वय साधून प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकतो . मात्र राजकीय इच्छाशक्तीचा अभाव असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आहे .
खात्यांचे मुख्य सचिव , महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वन संरक्षक आणि केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालय यांचे मंत्री व सचिव यांनी संयुक्त बैठक घेऊन आपले केंद्रातील मंत्री पद यांच्या प्रभावाने राज्य आणि केंद्र सरकार कडून प्रकल्पास पूर्णपूर्ण करावा असेही निवेदनात म्हटले
########
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकर्यांनी आजवर अनेक उग्र आंदोलने केली आहेत. मात्र प्रत्येक विभागाकडे स्वतंत्र पाठपुरावा करण्यात शेतकर्यांची दमछाक होत आहे, १० वर्षे निघून गेली आहेत, समुद्धी महामार्गासारखे महाकाय प्रकल्प पूर्ण होतात , त्यांना सर्व मंजुऱ्या एकाच ठिकाणी मिळतात ,शेतकऱ्यांची मागणी असलेल्या विषयांवर मात्र सरकार सोईस्कर पणे दुर्लक्ष करते.देवनाचा प्रकल्पासाठी एक खिडकी योजना राबवून प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा- भागवतराव सोनवणे, संयोजक जलहक्क संघर्ष समिती, येवला
#########
***********
असा आहे देवनाचा सिंचन प्रकल्प :-
************
एकुण खर्च मान्यता १२ कोटी ७७ लाख , ३६ हजार १५३
लाभार्थी गावे :- राहाडी खरवंडी , देवदरी
सिंचन क्षमता – ३५८ हेकटर
उपलब्ध होणारे पाणी ६५.३३ दश लक्ष घनफुट
धरणाची लांबी २२५ मीटर
धरणाची उंची १६. १८ मीटर
सांडव्याची लांबी ९० मी
बुडीत क्षेत्र ५७ हेक्टर
****************