ममदापूरात दूषित पाणी पुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!!
ममदापूरात दूषित पाणी पुरवठा; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर!!
येवला तालुक्यातील ममदापूर येथील नागरिकांना गेल्या काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे.यामुळे गेल्या काही दुर्गंधीयुक्त पाण्याचा वास सहन करावा लागत आहे. त्यामूळे प्रशासनाने याची दखल घेऊन शुद्ध तसेच पुरेसा पाणीपुरवठा करावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
मागील काही दिवसांपासून ममदापूर येथे हिरवट-पिवळसर रंगाचे पिण्याचे पाणी येत आहे. या दूषित पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.गावाला टँकर द्वारे येणार पाणी स्वच्छ येत आहे. परंतु त्या पाण्याची योग्य विल्हेवाट न करता
नळाद्वारे येणारे पाणी अत्यंत दूषित व गढूळ येत असल्याची नागरिकांमधून प्रचंड ओरड सुरु आहे. त्याचबरोबर गावात लाखो रुपये खर्च करून पाण्याचे फिल्टर लावले आहे.त्याद्वारे येणाऱ्या पाण्याची दुर्गंधी येत असल्याने नागरिक त्रस्त आहे.अनेक गंभीर आजार दूषित पाणी पिण्याने होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी एकप्रकारे खेळ सुरु असल्याच्या भावना व्यक्त होत आहे.
प्रशासनाला सर्वसामान्यांच्या वेदना कळणार कधी व केव्हा असा प्रश्नही उपस्थित यावेळी झाला आहे.
प्रतिक्रिया –
ममदापूरच्या ग्रामपंचायत प्रशासनाने पाण्याचं योग्य नियोजन न केल्यामुळे नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा दूषित होत आहे.ममदापूरकरांच आरोग्य धोक्यात आले आहे.
श्री देविदास गुडघे पाटील
संस्थापक अध्यक्ष छत्रपती फाऊंडेशन येवला- ममदापूर