आरबीआय,संचालित, राष्ट्रीय प्रबंधन संस्था पुणे : पुष्कर महाले यांस देशपातळीवरील सुवर्णपदक :
आरबीआय,संचालित, राष्ट्रीय प्रबंधन संस्था पुणे :
पुष्कर महाले यांस देशपातळीवरील सुवर्णपदक :
येवला : सचिन वखारे
भारतीय रिझर्व बँक संचालित राष्ट्रीय बँक प्रबंध संस्थान पुणे येथे बँकिंग क्षेत्रातील पीजीडीएम मध्ये, येवल्याच्या पुष्कर दत्तकुमार महाले याने देशात सर्वप्रथम क्रमांक मिळवत राष्ट्रीय पातळीवरील सुवर्णपदक पटकावले.
भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास आणि रेडिफमेल डॉट कॉमचे संस्थापक अजित बालकृष्णन यांच्या हस्ते पुणे येथे एका शानदार समारंभात हे विशेष सुवर्णपदक पुष्कर महाले यांस प्रदान करण्यात आले.पहिल्या पाच विद्यार्थ्यांना यावेळी अतिथींच्या हस्ते सन्मानित करण्यात आहे.
भारतीय रिझर्व बँक संचालित देशातील पुणे येथे एनआयबीएम हे एकमेव कॉलेज आहे. दोन वर्षांच्या या कोर्ससाठी दरवर्षी देशभरातून स्पर्धा परीक्षेद्वारे 120 मुलांची निवड या शिक्षणासाठी केली जाते.यात येवल्याचा पुष्कर महाले याने आपली क्षमता सिद्ध करीत देशभरात प्रथम क्रमांक मिळवत मानाचे सुवर्णपदक पटकावले.
या कुंदेन्दू..या प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
एनआयबीएम पुणेचे संचालक पार्था रे यांनी प्रास्ताविकात संस्थेचे 54 वर्षाच्या कामकाजाचा आढावा घेत संस्थेने केलेले आर्थिक व्यवस्थापनात देशासाठीचे करीत असलेले उपक्रम सांगून,कुटुंब,समाज व देशासाठी सेवा करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सर्व विद्यार्थ्यांना पदविका प्रदान केल्या.पुष्कर महाले यांस रेडीफमेल डॉट कॉम संस्थापक अजित बालकृष्णन,बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक ललित त्यागी यांनी विशेष सुवर्णपदक प्रदान केले.
अजित बालकृष्णन यांनी, जगभरात मोठ्या-मोठ्या बँका बंद झाल्या आहेत.अशा काळात आपल्या देशातील बँकिंग क्षेत्रातील संयोजन जागतिक पातळीवरील एक उदाहरण आहे.बँकिंग क्षेत्र डिजिटल जगताकडे येण्याचा हा संक्रमण कालावधी असून
यापुढे बँकिंग क्षेत्र हे मोबाइल मध्ये येणार असल्याचे सांगितले.
सूत्रसंचलन प्रा. स्मिता रॉय त्रिवेदी यांनी तर पदवीदान यादी वाचन, नियोजन व आभार प्रदर्शन प्राचार्य अरिंदम बंडोपाध्याय यांनी केले.आरबीआय डेप्युटी गव्हर्नर मायकल पात्रा, ऍक्सिस बँक सीईओ
अमिताभ चौधरी, स्टेट बँक चेअरमन दिनेशकुमार खरा,कॅनरा बँकचे सीईओ के.सत्यनारायण राजू,यासह विविध बँकांचे प्रतिनिधी,व प्राध्यापक वृंद, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साठी सचिन वखारे येवला