महाराजा यशवंतराव होळकर पहिले यांच्या अश्वारूढ पुतळ्याची शौर्य यात्रचे येवले शहरात मोठ्या उत्साहात स्वागत
*महाराजा यशवंतराव होळकर पहिले यांच्या अश्वारूढ पुतळ्याची शौर्य यात्रचे येवले शहरात मोठ्या उत्साहात स्वागत*. येवला (प्रतिनिधी) पुणे ते इंदोर महाराजा यशवंतराव होळकर यांचा अश्वारूढ पुतळा घेऊन निघालेल्या शौर्य यात्रेचे आज सकाळी येवले शहरात आगमन झाले. नाशिक जिल्ह्याच्या व येवला तालुक्याच्या वतीने वतीने या यात्रेचे भव्य दिव्य असे स्वागत करण्यात आले. शौर्य यात्रा स्वागत समितीच्या वतीने हुतात्मा स्मारक येथे महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले, आतिषबाजी करण्यात आली. हुतात्मा स्मारक येथिल सरसेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्याचे पुष्पहार घालून पूजन केले. यात्रेमध्ये सहभागी असलेले इंदोरचे राजे स्वप्निल राजे होळकर व यात्रेचे आयोजक सुधीर देडगे, ॲड.दत्ता शेंडगे, बापूसाहेब शिंदे, मुकुंदराजे होळकर यांचा समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आयोजन स्वागत समितीचे गणपतराव कांदळकर, दत्तात्रय वैद्य सर, मनोज दिवटे, मयुर मेघराज, राजेंद्र गांजे आदींनी केले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या शोर्याची, इतिहासातील कर्तुत्वाची माहिती, आपल्या प्रास्ताविकातून मनोज दिवटे यांनी दिली. चांदवड येथील व्याख्याते गणेश निंबाळकर यांनी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या पराक्रमाबाबत त्यांच्या कारकिर्दीतील लढाया, संघर्ष याबाबत सखोल माहिती दिली. हर्षल बुचडे, ॲड राशीनकर, मच्छिंद्र बिडकर,आप्पासाहेब सपना हरिभाऊ महाजन किरण चरमळ, शरद राऊळ श्रावण देवरे दत्तू देवरे सुनील पाचपुते समाधान बागल विजयजी हाके, रामभाऊआण्णा राशीनकर,गोरख शेठ शेंद्रे,बबनराव साळवे, भाऊसाहेब होंडे,उत्तम खांडेकर, सुदाम नाना लोंढे, प्रवीण जानराव, सुरेश गोराने,एकनाथ जानराव, हरिभाऊ सोनवणे देविदास पिंगट, आदी उपस्थित होते. ना. छगन भुजबळ यांच्या वतीने स्विय सहायक लोखंडे साहेब, संजय बनकर व ना.भारती ताई पवार यांच्या वतीने प्रमोद सस्कर व तरंग गुजराथी यांनी यात्रेचे स्वागत केले.भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मनोज दिवटे व भाजपाचे जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष मयुर मेघराज यांनी पैठणी शाल देऊन सत्कार केला.