ताज्या घडामोडी
रेंडाळे ता,येवला येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात *सांबर*जखमी
*ब्रेकिंग*
रेंडाळे ता,येवला येथे कुत्र्यांच्या हल्ल्यात *सांबर*जखमी
प्रतीनीधी वखारे, येवला.
कुत्र्याच्या हल्ल्यात सांबर जखमी
सचिन वखारे, येवला
येवला तालुक्यातील पूर्व भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली असून वन्यजीवांना पाण्या साठी मानवी वस्ती कडे धाव घेत आहे. अश्यातच मोकाट कुत्री ह्या प्राण्यावर हल्ला करतात अश्याच हल्ल्यात आज सकाळी तालुक्यातील रेंडाळे गावात सांबर जखमी झाल्याची घटना घडली आहे.
प्राणीमित्र प्रविण आहेर यांनी तातडीने त्या जखमी सांबरवर प्राथमिक उपचार करून वनविभागाच्या ताब्यात दिले. ममदापुर, राजापूर, भारम, कोळगाव, राहडी, रेंडाळे, या भागात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.