एम.एस.जी.एस. मध्ये महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा..
*एम.एस.जी.एस. मध्ये महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा..*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे शैक्षणिक संकुलात १ मे महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्षांच्या हस्ते ध्वज रोहन करून करण्यात आली. त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत व राज्यगीत गायन करण्यात आले. तसेच रामनाथकाका एंडाईत यांनी सहकार व शिक्षण महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थी – शिक्षकांचे अभिनंदन केले व सर्वांना महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमास अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक डॉ.भगिनाथ जाधव, राजेंद्र सोनवणे, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, ग्रामपालिकेच्या मा.सरपंच तथा विद्यमान सदस्या विनिताताई अमोल सोनवणे, संदीप वाकचौरे, इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यू.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल आहेर यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.