कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक मतमोजणीत डॉ राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धक्का. महाविकास आघाडीचा दहा जागांवर विजय .*
*कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक मतमोजणीत डॉ राहुल आहेर यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला धक्का. महाविकास आघाडीचा दहा जागांवर विजय .*
पोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवडा*: भाजपाचे विद्यमान आमदार डॉ.राहुल आहेर व डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्या सत्तेतील पॅनलला सात जागांवर रोखून महाविकास आघाडीच्या माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला दहा जागांवर विजय मिळवून कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता खेचून आणण्यात यश आले आहे.
या निवडणुकीत प्रहार चे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर यांचा विजय अपक्ष निवडणूक लढवून झाल्याने प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आनंद उत्सव साजरा केला.
महिला गटातील सौ. मिना बापू शिरसाट व सौ. गीता झाल्टे यांच्यात दोन मतांचा फरक झाल्याने फेरमतमोजणी होऊन त्यात सौ. मीना शिरसाट यांचा एकमताने विजय झाला.
यात ग्रामपंचायत सर्वसाधारण जनरल गट आहेर नितीन रघुनाथ (४५४),
जाधव संजय दगू (४११),
इतर मागासवर्ग प्रवर्गातून शिरीष कुमार वसंतराव कोतवाल (६३१),
भटक्या विमुक्त जाती गटातून विक्रम बाबा मार्कंड (५१५),
आर्थिक दुर्बल घटक या गटातून गणेश निंबाळकर (२९५),
अनुसूचित जाती जमाती गटातून वाल्मीक वानखेडे (३९२), तर
महिला राखीव गटातून डॉ.सौ. वैशाली शामराव जाधव (६६१), सौ.मीना बापू शिरसाट (४३५),
सोसायटी सर्वसाधारण गटातून
डॉ.आत्माराम पोपटराव कुंभार्डे (५९१) डॉ. सयाजीराव नारायणराव गायकवाड (५८८), जाधव सुखदेव दशरथ (५२५), आहेर कारभारी भाऊसाहेब (५०३), ढोमसे योगेश विलासराव (५१२), डॉ. राजेंद्र रामदास दवंडे (४९०), पंढरीनाथ दामोदर खताळ (४६३), तर
व्यापारी गटातून सचिन मिस्त्रीलाल अग्रवाल (१७०), पलोड सुशील श्रीकांत (१५८), हमाल तोलारी गट पवार रवींद्र दौलत (७५), हे उमेदवार विजयी झाले. असून
यात महाविकास आघाडीचे दहा भाजपाचे सात तर एक अपक्ष प्रहार संघटना असे एकूण १८ जण विजयी झाले आहेत. मतमोजणीची प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी तैनात करण्यात आला होता त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार निवडणूक मतमोजणीच्या ठिकाणी झाला नाही. फटाके गुलालाची उधळण करत विजयी उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी स्वागत केले.