शिर्डीत रमजान ईद उत्सवात साजरी व हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले
शिर्डीत रमजान ईद उत्सवात साजरी व हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडले
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
धार्मिक बातमीः
शिर्डी शहरातील रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली त्यात विशेष म्हणजे हिंदू मुस्लिम एकात्मतेचे दर्शन घडले, हिंदू बांधवानी मोठया संख्येने येऊन मुस्लिम बांधवाना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या,यावेळी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ व उप पोलीस निरीक्षक दाते साहेब यांनी रमजान ईद निमित्ताने ईदगाह वर मुस्लिम बांधवांना गुलाबांची गुच्छ देऊन स्वागत केले ईद मुबारक म्हणून शुभेच्छा दिल्या यावेळी पीआय नंदकुमार दुधाळ एपीआय दाते साहेब यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता त्या अनुषंगाने गफ्फार भाई पठाण यांनी पोलीस निरीक्षक दुधाळ साहेबांचे एक कर्तव्य दक्ष पोलीस अधिकारी व चांगली कामगिरी बजावत आहे म्हणून अभिनंदन केले तसेच त्यांचे सर्व भागातून अभिनंदन होत आहे यावेळी गफ्फार भाई पठाण हाजी शमशुद्दीन भाई इनामदार शफिक शेख वसीम पठाण नदीम पठाण उवैसं पठाण आधी मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते