जादूटोणा विरोधी कायदा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा !…. समाजसेवक गजानन हरणे. अकोला..
जादूटोणा विरोधी कायदा समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा !…. समाजसेवक गजानन हरणे. अकोला..
सुबोध सावंत -नवी मुंबई प्रतिनिधी
आज अंधश्रद्धेने संपूर्ण देशामध्ये थैमान घातलेले आहे. रोज एक भोंदू बाबा निर्माण होऊन जनतेची लुबाडनूक करीत आहे. अशा परिस्थितीत अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तयार केलेला जादूटोणा विरोधी कायदा समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यासाठी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन गजानन हरणे समाजसेवक तथा जिल्हाउपाध्यक्ष अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती अकोला यांनी खडकी येथील पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालयामध्ये आयोजित व्याख्यानाला मार्गदर्शन करताना केले. श्रीमती पंचफुला देवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी व सामाजिक न्याय विभाग समाजकल्याण कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय पर्व अभियान अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा तसेच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रसार प्रचार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस.गोरे हे होते. तर प्रमुख वक्ते म्हणून गजानन हरणे समाजसेवक तथा संयोजक निर्भय बनो जनआंदोलन. प्रमुख उपस्थिती डॉ.एस .एम .भोवते, वैशाली गवई समतादूत बार्टी आदीं मान्यवर मंचावर उपस्थित होते. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संदीप भोवते यांनी केले. तर जादूटोणाविरोधी कायदा व अंधश्रद्धा निर्मूलनावर गजानन हरणे यांनी मार्गदर्शन केले. अनुसूचित जाती जमाती आत्याचार प्रतिबंधक कायद्याविषयी एडवोकेट वैशाली गवई समतादूत यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस.गोरे यांनी केलं कार्यक्रमाचे संचालन हरिओम राखोडे तर आभार प्रदर्शन प्रीतेश गवई यांनी केले. कार्यक्रमाला समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी ,विद्यार्थिनी तसेच समाज कल्याण कार्यालयाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .कार्यक्रम शांततेतेच्या वातावरणात पार पडला. कार्यक्रमाचा समारोप प्रश्न उत्तराने करण्यात आला.