अनुराग स्टेट बँक कॉलनीत चोरट्यांनी बंद घर फोडले
जळगाव: प्रतिनिधी शाहिद खान
शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनीत बन घर सोडून घरातून सोन्याची दागिने व असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा बेवत चोर त्यांनी चोर नेल्याची घटना उघडकिला आहे. या संदर्भात रविवारी २३ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.रामानंदनगर पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, बद्रीनाथ जवाहरलाल चौधरी (वय-४९) रा. अनुराग स्टेट बँक कॉलनीत जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. अक्षय तृतीयेचे बद्रीनाथ चौधरी हे २२ एप्रिल रोजी घर बंद करून बाहेरगावी गेले होते. त्यावेळी घर बंद असल्याची फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या दरवाजेचा कुलूप तोडून आता प्रवेश केला. कपाटातुन सोन्या चांदीचे व रोकड असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.
बद्रीनाथ चौधरी हे रविवारी २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता घरी आल्याने त्यांच्या घरात चोरी झाल्याची लक्षात आले. या संदर्भात त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञात छोट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील करीत आहे.