धरणग्रस्त( दानोळी) गोठणे वसाहतीमध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध विहार उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
धरणग्रस्त( दानोळी) गोठणे वसाहतीमध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती व बुद्ध विहार उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न
पत्रकार राहुल घोलप
ता. शिरोळ जिल्हा.कोल्हापुर येथील
धरणग्रस्त( दानोळी) गोठणे वसाहतीमध्ये सावळा मास्तर गोठणेकर स्मृति प्रतिष्ठान संचलित बोधिसत्व युवा विचार मंच आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 132 वी व राष्ट्रपिता क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले यांची 196 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व
डॉ .बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहार उद्घाटन व बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी दिनांक 13 एप्रिल रोजी सायंकाळी चार वाजता बुद्ध मूर्तीची रॅली गावातुन काढण्यात आली ध्वजारोहण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बुद्ध विहार उद्घाटन बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना डॉ.भन्ते यशकाश्पायन महाथेरो यांच्या हस्ते करण्यात आले या विहारासाठी बुद्ध मूर्ती ऍ.सी .आर.सांगलीकर यांच्याकडून दान करण्यात आली 14 तारखेला आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले व सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. डॉ.भारत पाटणकर श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते या कार्यक्रमासाठी वक्ते मा. आलिशा मोहिते. युवा व्याख्याते कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. नजीर भाई चौगुले . संघटक श्रमिक मुक्तिदल महाराष्ट्र राज्य हे होते. कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर मा. इंजिनिअर फारूक गवंडी .राज्य सदस्य अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र. ऍ.सिद्धार्थ काकडे. ऍ. बाळासाहेब अंकलेकर मा. विश्वजीत कांबळे .मा. सतीश भारतवाशी मा. सचिन घोलप. मा. शरद घोलप मा. शाहीर दीपक भाई .गोठणेकर व बोधिसत्व युवा विचार मंच या मंचचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते गावकरी धम्मबांधव बौद्ध उपासक उपासिका तसेच गावातील मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील कांबळे यांनी केले व आभार विजय गोठणेकर यांनी मानले