ताज्या घडामोडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून* *वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेमधून येवला मतदारसंघात १ कोटींची विविध विकासकामे मंजूर*

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून*
*वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेमधून येवला मतदारसंघात १ कोटींची विविध विकासकामे मंजूर*

*नाशिक,येवला,दि.११ मार्च :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना सन २०२२-२३ मधून तांडा वस्तीत पाणी पुरवठा, पाईप लाईन, सभामंडप, रस्ता कॉंक्रीटीकरण या विविध १ कोटी रुपयांच्या विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. या विकास कामांमुळे तांडा वस्तीत राहणाऱ्या नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्र राज्यात भटक्या जमातीच्या अनेक जाती, जमाती अजूनही भटकंती करून स्थलांतरीत स्वरूपाचे जीवन जगत आहेत. यामध्ये लमाण, बंजारा, धनगर, पारधी अशा अनेक समूहांचे तांडे, वस्त्या असून अशा तांड्यामध्ये या जाती जमातीचे बांधव अनेक वर्षांपासून राहतात. मात्र याठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध होत नसल्याने बहुसंख्य समाज हा गरिबीचे जीवन जगात आहे. त्यामुळे या नागरिकांना चांगले जीवन जगता यावे यासाठी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेच्या माध्यमातून विविध सुविधा निर्माण करून देण्यात येतात. येवला मतदारसंघात देखील हे तांडे आणि वस्त्यांचे प्रमाण अधिक असून त्यांचा विकास करण्यासाठी माजी छगन भुजबळ यांचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यांच्या या विशेष प्रयत्नांतून तांडा वस्तीच्या विकासाठी १ कोटी रुपयांची विविध विकास कामे मंजूर झाली आहे.

यामध्ये येवला तालुक्यातील ममदापूर येथे साबळे वस्तीत पाण्याची सुविधा निर्माण करण्यासाठी १० लक्ष, अंदरसूल येथे धनगर गल्ली येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, गोरख सैंदर वस्ती येथे सभामंडप बांधण्यासाठी १० लक्ष, भारम येथे जानराव वस्तीत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, उंदीरवाडी येथे धनगर वस्तीत पाईपलाईन टाकण्यासाठी १० लक्ष, महालखेडा बुवाजी बाबा नगर रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, राजापूर वाघ वस्ती रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष, नगरसुल वऱ्हे धनगर वस्तीत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी ४ लक्ष, सानप वस्तीत रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी ६ लक्ष, अनकाई येथे वसंतनगर २ मध्ये पाणी पुरवठा करण्यासाठी १० लक्ष तर सायगांव कोकणे वस्ती येथे रस्ता कॉंक्रीटीकरण करण्यासाठी १० लक्ष अशा एकूण १ कोटी रुपयांच्या ११ विविध विकास कामांना प्रशाकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या कामांना सुरवात होऊन कामे पूर्ण होणार आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!