*एम.एस.जी.एस. मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी.*

*एम.एस.जी.एस. मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी.*
अंदरसुल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश स्कूल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते. कार्यक्रमाची सुरवात ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेला व सहकार महर्षी गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्प हार अर्पण करून तसेच स्व.विजय(दादा) सोनवणे यांना द्वितीय पुण्य स्मरण निमित्त आदरांजली वाहून करण्यात आली.शिक्षक अमोल आहेर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना मांडली. त्यानंतर सकाळ वृत्तपत्र यांच्या तर्फे इ. ४थीची विद्यार्थिनी ऋतुजा अनिल रोठे हिला शिष्यवृत्ती देण्यात आल्या बद्दल तसेच इ. ४थीची तन्वी लक्ष्मण माळी हिला “मंथन जनरल नॉलेज परीक्षेत” येवला तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळाल्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते दोघींचा सत्कार करण्यात आला.त्या नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “परीक्षा पे चर्चा” या चित्रकला स्पर्धेत इ.९वीच्या विद्यार्थ्यांना प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात आले.
विद्यार्थी भाषणात स्नेहल वडाळकर, अनुष्का देशमुख, अदिती खैरनार यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.तसेच शिक्षिका शोभा निकम यांनी ज्योतिराव फुले यांच्यावर स्वरचित कवितेचे गायन केले.अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींच्या शिक्षणासाठी, गोर-गरीबांसाठी, मागासवर्गीयांसाठी, शेतकऱ्यांसाठी, बाल विवाह थांबवण्यासाठी जे परिश्रम घेतले त्याची माहिती दिली तसेच स्व.विजय(दादा) सोनवणे यांना द्वितीय पुण्य स्मरण निमित्त आदरांजली वाहिली.
सदर कार्यक्रमास अंदरसुल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, सरचिटणीस अमोल सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, संचालक जीवन गाडे, उज्ज्वल जाधव, आकाश सोनवणे, अंदरसुल ग्रामपंचायतीच्या मा. सरपंच तथा विद्वान सदस्या विनीताताई अमोल सोनवणे, रामनाथ काका एंडाईत, संदीप वाकचौरे, किशोर सोनवणे, पालक अरविंद माळी, अनिल रोठे, इंग्लिश मिडीयमचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, ज्यू.कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सेमी इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अझहर खतीब यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपक खैरनार यांनी मानले.