येवला मतदारसंघातून जाणाऱ्या नांदगाव, भारम व नांदेसर रस्त्यावर रेल्वे ओव्हर ब्रिजची निर्मिती करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*
*येवला मतदारसंघातून जाणाऱ्या नांदगाव, भारम व नांदेसर रस्त्यावर रेल्वे ओव्हर ब्रिजची निर्मिती करा – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ*
*सेतू बंधन योजनेअंतर्गत येवला मतदारसंघातील नांदगाव, भारम व नांदेसर रस्त्यावर रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्याची माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी*
*नाशिक,येवला,दि.१० एप्रिल:-* येवला मतदारसंघातील येवला नांदगाव हा राज्यमार्ग व येवला भारम तसेच येवला नांदेसर या प्रमुख जिल्हा मार्ग रस्त्यांवर सेतू बंधन योजनेअंतर्गत रेल्वे ओव्हर ब्रिज निर्माण करण्यात यावेत अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, येवला शहर हे पैठणीचे माहेरघर असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पैठणीचे मार्केट आहे. तसेच शेती क्षेत्रातही येवला अग्रेसर असून येवला मतदारसंघात येवला व नगरसूल ही दोन महत्वाची रेल्वे स्थानके आहे. या दोन रेल्वे स्थानकातून देशभरात शेतमाल, खत यासह विविध मालाची वाहतूक करण्यात येते. तसेच याठिकाणी प्रवासी वाहतूक देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात रहदारी आहे. सदरचे रेल्वे मार्ग हे येवला नांदगाव, येवला भारम व येवला नांदेसर रस्त्यांना जोडणारा आहे. त्यामुळे याठिकाणच्या वाहतुकीचा विचार करता रेल्वे ओव्हर ब्रिज तयार करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच पुढे म्हटले आहे की, केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेमध्ये येवला वैजापूर या रस्त्याचा समावेश असून राज्य मार्ग २५ येवला नांदगाव, प्रमुख जिल्हा मार्ग ७८ येवला भारम व प्रमुख जिल्हा मार्ग ८० येवला नांदेसर हे रस्ते या मुख्य रस्त्याने जोडले जातात. त्यामुळे शासनाच्या सेतू बंधन योजनेअंतर्गत या रस्त्याचा विकास करणे शक्य आहे. त्यामुळे या रस्त्यांवर रेल्वे ओव्हर ब्रिज विकसित करण्यात यावे अशी मागणी छगन भुजबळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.