ताज्या घडामोडी
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा अनुदान नोंदणी साठी गर्दी
येवला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये
कांदा अनुदान नोंदणी साठी गर्दी
सचिन वखारे, येवला:-
महाराष्ट्र शासनाने कांद्याला 350 रुपये अनुदान देण्याचे जाहीर केले आहे त्यात आज पासून येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पासून नोंदणी चालू केली असून शेतकऱ्यांची नोंदणी साठी प्रचंड गर्दी झाली असून लांबच लांब रांगा लागल्या होत्या शासनाने ही नोंदणी 20 एप्रिल पर्यंत करून घेणार असून अनेक शेतकरी कागद पत्रांची जुळवाजुळव करीत आहे. शेतकरी बांधवांनी कांदा विक्री केल्याच्या पावत्या सातबारा उतारा जर मुलाच्या किंवा अन्य नातेवाईक यांच्या नावावर कांदा विक्री केली असेल तर त्याचा पुरावा देखील देण्याची अट देखील आहे तर पात्र शेतकऱ्यांनी लवकरात लवकर नोंदणी करावी असे आवाहन प्रशासक पाडवी यांनी केले आहे.