मनमाड डेपोच्या बसला मतेवाडी फाटा गांगुर्डे वस्ती या ठिकाणी भीषण अपघात 17 जखमी एक महिला कंडक्टर ठार*

*मनमाड डेपोच्या बसला मतेवाडी फाटा गांगुर्डे वस्ती या ठिकाणी भीषण अपघात 17 जखमी एक महिला कंडक्टर ठार*
पोलीस टाईम्स न्यूज /सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड*: वणी गडावरून निघालेली मनमाड डेपोची बस क्रमांक एम एच 14 बीटी झिरो एक झिरो नऊ ही भरधाव वेगाने चांदवड कडे येत असताना मतवादी फाटा येथील गांगुर्डे वस्ती जवळ झाडावर आढळून अपघात झाला असून बसची एक बाजू पूर्णपणे अपघातात निघून गेली असून समोर बसलेल्या महिला कंडक्टर सारिका युवराज अहिरे उर्फ सारिका पगारे या अपघातात घटनास्थळी मृत झाले असून जखमी झालेले गणेश किरण काटे बाळकृष्ण गोपाळ खैरनार संगीता बाळकृष्ण खैरनार यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे
यात केशव भामरे लासलगाव, शब्बीर शेख चांद मालेगाव, दिनकर काळे रेडगाव, सचिन चव्हाण दरसवाडी, ऋषिकेश सदगीर मालेगाव, गोपाल चव्हाण सतपाल सिंग मनमाड, दशरथ पंढरी गोपीचंद मातोळकर जालना, यांच्यावर उपजिल्हा रुग्णालय चांदवड या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर देवडे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वाघ व द्वारकाधीश हॉस्पिटलचे डॉक्टर निकम यांनी उपचार केले
सदर अपघाताच्या ठिकाणी चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव पोलीस नाईक सुनील जाधव पोलीस नाईक हेंबाडे यांच्यासह सोमा टोलवैज कर्मचाऱ्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी अपघातातील जखमींना उपजिल्हा रुग्णालयात चांदवड या ठिकाणी पोहोचवण्यासाठी विशेष मदत केली.
नाशिक येथे उपचारासाठी नेत असतानाच संगीता बाळकृष्ण खैरनार मनमाड ही महिलामृत झाल्याचे समजते