ताज्या घडामोडी
उंदिरवाडी गावचे भूमिपुत्र श्री. लिंबाजी दौलतराव सोनवणे (एल.डी. सोनवणे) साहेब यांची नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती
सचिन वखारे, येवला:–
उंदिरवाडी गावचे भूमिपुत्र श्री. लिंबाजी दौलतराव सोनवणे (एल.डी. सोनवणे) साहेब यांची नाशिक शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये सहाय्यक शिक्षण संचालक म्हणून नियुक्ती झाली, त्याबद्दल त्यांचा एन्झो केम विद्यालय, येवला येथे विद्यालय व संस्थेच्या वतीने संस्थेचे प्र. अध्यक्ष श्री. रमेशचंद्र पटेल व सेक्रेटरी श्री. सुशीलशेठ गुजराथी यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.त्याप्रसंगी उपस्थित सहाय्यक शिक्षण संचालक श्री. एल डी सोनवणे साहेब, संस्थेचे पदाधिकारी,एल.डी. सोनवणे साहेब यांचे मित्र बबनराव जेजुरकर, विद्यालयाचे प्र. प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, उच्च माध्यमिक प्रमुख,शिक्षक/शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.