ताज्या घडामोडी

*झरे सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व :

*झरे सोसायटीवर जगताप गटाचे वर्चस्व :

प्रतिनिधी करमाळा झरे: असिफ मुल्हानी.

झरे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार जयवंतराव जगताप गटाने सर्वच्या सर्व १३ जागांवर विजय मिळविला आहे . जगताप गटाचे खंदे समर्थक नारायण शेठ आमृळे यांच्या नेतृत्वा खालील ज्योर्तिलिंग जनसेवा शेतकरी विकास पॅनेलचे १२ उमेदवार विजयी झाले . भटक्या विमुक्त जाती जमाती प्रतिनिधी म्हणून महादेव काळे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले होते . अन्य विजयी उमेदवारामधे अकबर मुलाणी,दत्तू चौधरी , अर्जुन गायकवाड , अशोक गुंजाळ , महादेव घाडगे , कल्याण कोठावळे , पांडुरंग मावलकर , राजेंद्र मावलकर ( सर्वसाधारण कर्जदार खातेदार मतदारसंघ ) अशोक सरोदे ( अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी मतदारसंघ ) भानुदास बोराटे ( इतर मागास प्रवर्ग प्रतिनिधी) लक्ष्मीबाई आमृळे , कमल कांबळे ( महिला प्रतिनिधी )यांचा समावेश आहे . सर्व विजयी उमेदवारांचे आमदार संजयमामा शिंदे ,माजी आमदार जयवंतराव जगताप , नगराध्यक्ष वैभव जगताप,तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष शंभुराजे जगताप यांनी अभिनंदन केले आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सौ .एस . के . मुंढे यांनी काम पाहीले . मतदान व मतमोजणी वेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!