ताज्या घडामोडी

*पेठवडगाव तालुका होण्यासाठी ३० गावच्या सरपंच -उपसरपंच यांची वज्रमूठ*

*पेठवडगाव तालुका होण्यासाठी ३० गावच्या सरपंच -उपसरपंच यांची वज्रमूठ*

प्रतिनिधी:रोहित डवरी पेठ वडगाव, कोल्हापूर

पेठ वडगाव तालुका होण्यासाठी ३० गावच्या सरपंच -उपसरपंचांची व विविध विभागातील संघटनेतील आणि पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी पेठ वडगाव तालुका कृती समितीला दिला मोठ्या प्रमाणात पाठिंबा.
पेठ वडगाव येथील बळवंतराव यादव हायस्कूल येथे वडगाव तालुका कृती समितीच्या निमंत्रक विद्याताई पोळ यांच्या नेतृत्वाखाली सरपंच उपसरपंच प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी निवृत्त पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ होते. माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील, हातकलंगले पंचायत समितीचे माजी उपसभापती अजय पाटील खोची, पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव आबा, विजय शहा, सुनील हुक्केरे, गुरुप्रसाद यादव, हर्षवर्धन चव्हाण , प्रमुख उपस्थित होते.
विद्याताई पोळ म्हणाल्या, पेठ वडगाव तालुक्यासाठी नियोजित गावासाठी हे मध्यवर्ती ठिकाण आहे दळवणाची सोय आहे. सामाजिक व शैक्षणिक, अर्थिक क्षेत्रात प्रगतीपथावर असलेले हे गाव आहे. ग्रामस्थांच्या प्रशासकीय सोयीसाठी वडगाव तालुका झाला पाहिजे सर्वांच्या एक जूटीतून वडगावला तालुका करूया असे प्रतिपादन विद्याताई पोळी यांनी केले.
तालुका कृती समितीचे अध्यक्ष गुलाबराव पोळ म्हणाले शासकीय यंत्रणाकडे देणारा प्रस्ताव तयार करण्यात येणार आहे. याची माहिती परिसरातील नागरिकांना देण्यात येणार आहे. आपण शिस्तबद्ध आंदोलन करूया.
पेठ वडगाव तालुका झाल्यानंतर वृद्ध व तरुण लोकांच्या शासकीय कामे योग्य वेळेत आणि अगदी जलद गतीने होण्यास सोयीस्कर होईल. भागातील सर्व खेड्यापाड्यातील लोकांना अगदी जवळच व सोयीस्कर तालुक्यातील शासकीय कामे करता येते असे प्रतिपादन माजी पंचायत समिती उपसभापती अजय पाटील खोची यांनी केले.
अंबप गावच्या सरपंच दीप्ती माने म्हणाल्या, सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कामे करण्यासाठी हातकलंगले हे अडचणीचे ठरत आहे त्यामुळे परिसरातील सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी एकत्रित रित्या येऊन या मागणीचा रेटा वाढवूया. परिसरातील 30 ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखी पाठिंबा दिल्यामुळे वडगाव तालुका होण्यास अधिक गती मिळत आहे. हातकलंगले विस्तारित तालुका असल्यामुळे पश्चिम भाग हा अविकसित राहिला आहे कार्यालयात जागा देण्यास वडगावकरांना तयार करण्यात येत आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी, भेंडवडे सरपंच स्नेहल माने, लाटवडे उपसरपंच बाबासो भोपळे संभाजी पवार हर्षवर्धन चव्हाण , अभिजीत गायकवाड, शिवाजीराव आवळे,कासारवाडी गावचे सरपंच अच्युत खोत ,वकील एन आर पाटील, वकील शहाजी पाटील, शहाजी सिद्ध ,मनोज पिसे, बाबासो भोपळे, वारणा बँकेचे संचालक धोंडीराम सिद्ध, वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील कुंभोज, गुरुप्रसाद यादव, हातकलंगले पंचायत समिती सदस्य वसंतराव गुरव आबा, प्रकाश जिरंगे, रामकृष्ण लोकरे ,विकास नाईक, आदींनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी स्वागत व प्रास्ताविक राजकुमार चौगुले यांनी केले .सूत्रसंचालन दीपक पाटील यांनी केले .तर आभार सचिन पाटील यांनी मांडले. मेळाव्याचे नियोजन संतोष सलगर व संपूर्ण टीम यांनी केले.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!