छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…..* *प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत येवला मतदारसंघातील खेडलेझुंगे येथे १ कोटी रुपयांची पर्यटन विकासाची विविध कामे मंजूर*
*छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून…..*
*प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत येवला मतदारसंघातील खेडलेझुंगे येथे १ कोटी रुपयांची पर्यटन विकासाची विविध कामे मंजूर*
*नाशिक,येवला,दि.१ एप्रिल :-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील खेडलेझुंगे येथे प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत विविध विकासकामांसाठी १ कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे खेडलेझुंगे या धार्मिक स्थळांचा अधिक विकास होऊन पर्यटनाच्या अधिक पायाभूत सुविधा नागरिकांना उपलब्ध होणार आहे.
प्रादेशिक पर्यटन विकास योजना सन २०२२-२३ अंतर्गत जिल्हास्तरावरील नवीन कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रादेशिक पर्यटन योजनेअंतर्गत छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील श्री.क्षेत्र खेडलझुंगे येथे वै.हभप तुकारामबाबा कुटीया व महादेव मंदिर येथे सभामंडप बांधण्यासाठी २० लक्ष, संतवन येथे कॉंक्रीटीकरण करण्यासाठी २० लक्ष, हनुमान मंदिर, नवग्रह मंदिर व नक्षत्रवन येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लक्ष, संतवन व नक्षत्रवनात विद्युतीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी १० लक्ष, खंडेराव मंदिर येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी १० लक्ष, संतवनात पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी २० लक्ष असे एकूण १ कोटी रुपयांचे विविध विकासकामे मंजूर करण्यात आले आहे.