जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन संपन्न
जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे उद्घाटन संपन्न
सचिन वखारे, येवला–
अनेक दिवसांपासून येवला तालुक्यांत जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरु व्हावे ही अनेक दिवांपासून येवलेकरांची मागणी आता पूर्ण झाल असून दिनांक 2 एप्रिल रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री संदीपजी मारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन सांबरे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला असून या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नाशिक श्रीचंद्र जगमालानी हे होते 2004 या वर्षी येवला वकील संघाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालय मध्ये या संदर्भात पत्र व्यवहार करून मागणी करण्यात आली होती दरम्यान माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी देखील मंत्रालयीन स्थरावर पाठपुरावा करून येवला येथे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय सुरू व्हावे या साठी प्रयत्न केले होते.गेल्या 25 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर येवला प्रत्यक्षात आज उद्घाटन सोहळा संपन्न होत असल्यामुळे येवलेकरांमध्ये उत्साहाचे वातावरण हो याप्रसंगी जिल्हा न्यायाधीश डॉ यू जे मोरे, आ. नरेंद दराडे, माजी आमदार मारोतराव पवार, माणिकराव शिंदे, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे स्वीय सहाय्यक बालासाहेब लोखंडे, तहसिलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी नागेंद्र मुतकेकर, सार्वजनिक अभियंता सागर चौधरी यांच्या सह वकील संघाचे अध्यक्ष अॅड एस टी कदम, सरचिटणीस किरण देशमुख, संतनु कांदळकर , रविराज गोतीस अॅड सिमरन पंजाबीयांच्या सह वकील संघाचे सर्व सदस्य उपस्थीत होते.