ताज्या घडामोडी

नागरिकाने सोशल मिडीयावरील व्हाट्स अप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील अगर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त फोटो, व्हिडिओ, मजकूर किंवा स्टेटस ठेवू नये.

मनमाड शहरातील तमाम जनतेस आव्हान करण्यात येते की,शहरातील कोणीही व्यक्ती अगर नागरिकाने सोशल मिडीयावरील व्हाट्स अप, फेसबुक, इंस्टाग्राम यावर कोणाच्याही धार्मिक भावना दुखावतील अगर दोन समाजात तेढ निर्माण होईल असे वादग्रस्त फोटो, व्हिडिओ, मजकूर किंवा स्टेटस ठेवू नये. कोणासही असा प्रकार निदर्शनास आल्यास त्याबाबत तात्काळ पोलिसांना कळवावे. संबंधित व्यक्तीवर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. मात्र जे कोणी नागरिक अशा प्रकारचे वादग्रस्त फोटो, स्टेटस,मजकूर अगर व्हिडिओ ठेवून शहरात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतील त्याची तात्काळ दखल घेऊन संबंधित व्यक्ती विरुद्ध कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. पोलिसांचे सोशल मिडियावर बारकाईने आहे. ग्रुप चे ॲडमिन यांनी देखील आपल्या ग्रुप वर अशा प्रकारचे वादग्रस्त फोटो, व्हिडिओ अगर मजकूर टाकला जाणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारचे कृत्य करताना कोणीही आढळून आल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध व ग्रुप ॲडमिन यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

बाळासाहेब थोरात
पोलीस निरीक्षक
मनमाड शहर पोलीस स्टेशन

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!