ताज्या घडामोडी
गटशिक्षणाधिकारी मा. भास्कर कनोज साहेब यांची राजापूर शाळेस भेट
मनोहर देसले पिंपळगाव बसवंत

आज शनिवार दिनांक एक एप्रिल रोजी दिंडोरी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा. भास्कर कनोज साहेब यांनी राजापूर शाळेत सकाळी साडेसात वाजता भेट दिली. यावेळी त्यांनी परिपाठ, कवायत,विद्यार्थी गुणवत्ता,शैक्षणिक साहित्य वापर, वर्गभेट, परसबाग, क्रीडांगण, बगीच्या अशा सर्व बाबी बारकाईने पाहून कौतुक करून मार्गदर्शन केले.
यावेळी साहेबांनी शालेय स्वच्छता, विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व सर्व शिक्षकांचे कौतुक करून एकत्रित टीम वर्कने राबवलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक व आणखी भौतिक सुविधा काय काय उपलब्ध करता येतील याचे मार्गदर्शन केले . यावेळी मुख्याध्यापिका मीना लोहकरे,धनंजय वानले, निवृत्ती चारोस्कर,विजय ठाकरे, राहुल परदेशी,विश्वास आहेर उपस्थित होते.