कळवण — दिंडोरी, कळवण, पेठ व सुरगाणा येथील बस स्थानकांचे नूतनीकरण होणार ३१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्पात तरतूद – केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार.
कळवण — दिंडोरी, कळवण, पेठ व सुरगाणा येथील बस स्थानकांचे नूतनीकरण होणार
३१ कोटी ९९ लाखांचा अर्थसंकल्पात तरतूद – केंद्रीय राज्यमंत्री डॉ भारती पवार.
पोलीस टाईम्स प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
कळवण दि ३१ दिंडोरी लोकसभा मतदार संघात बसमध्ये प्रवाशांची वाढती गर्दी, त्यांच्यासाठी मूलभूत सुविधाचा अभाव लक्षात घेऊन दिंडोरी, कळवण, पेठ व सुरगाणाया आदिवासी तालुक्यातील एस टी बस स्थानक नूतनीकरण करण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात ३१ कोटी ९९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांचेक्डर आदिवासी बहुल भाग म्हणून विशेष तरतूद करण्याची मागणी केली करण्यात आली असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री पवार यांनी सांगितले. त्यानुसार दिंडोरी लोकसभा मतदार संघातील दिंडोरी बस स्थानकाचे आधुनिकीकरण करण्यासाठी १० कोटी, कळवण बसस्थानकाचे नुतनीकरण व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ७ कोटी ९५ लाख, पेठ बस स्थानकाची पुनर्बांधणी करण्यासाठी ८ कोटी ६७ लाख रुपये तर सुरगाणा येथील बसस्थानकाचे नुतनीकरण व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी ४ कोटी १७ लाख रुपयांची तरतूद केली आहे.
या तरतुदीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लाखो भाविक चैत्रोत्सव व नवरात्रौत्सव निमित्ताने सप्तश्रुंग गडावर येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होणार आहे, उत्तर महाराष्ट्रातील सर्व भाविक कळवण येथूनच बसने गडावर जात असल्यामुळे कळवण येथील एस टी बस स्थानकाची जिल्ह्यात वेगळी ओळख आहे. जिल्हाभरातील हजारो प्रवाशांची बस स्थानकात वर्दळ असते. शेकडो बसेसच्या फेऱ्या येथे नियमित होतात. बस स्थानकाचे बसस्थानकाचे नुतनीकरण व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करण्यासाठी प्रस्ताव शासनस्तरावर प्रस्तवित करण्यात आला होता. नुकत्याच पारपडलेल्या आदिवेशनात आदिवासी बहुल भाग म्हणून पाठपुरावा केल्याने त्यास महाराष्ट्र राज्य आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत तरतूद करण्यात आली आहे. या बसस्थानकात नूतनीकरणात नवीन फरशा, रंगरंगोटी, प्रवाशांना बसण्यासाठी प्रशस्त आसन व्यवस्था, अंतर्गत वीज जोडणी, आकर्षक दिवे, पंखे, प्रवाशांना बसेसची माहिती होण्यासाठी डिस्प्ले तसेच अन्य सुविधा यातून करण्यात येणार आहेत.
करिता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत आदिवासी क्षेत्रातील राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक विकास, बांधकाम, दुरुस्ती, नूतनीकरण, व वाहनतळाचे काँक्रिटीकरण करणे अन्य कामासाठी राज्यासाठी ३५ कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली असून त्यात कळवण व सुरगाणा येथील एस टी बस स्थानक नूतनीकरण करण्यासाठी १२ कोटी १२ लाखांची तरतूद झाली आहे.