ताज्या घडामोडी

शहरातील गंगादरवाजा भागातील जागृत वनवाशी श्री राम मंदिर शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी येथे रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींना महाभिषेक,प्रवचन,भजन व नऊदिवसांचा उत्सव आयोजित करण्यात येतो.

येवला -शहरातील गंगादरवाजा भागातील जागृत वनवाशी श्री राम मंदिर शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी येथे रामनवमी निमित्त प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तींना महाभिषेक,प्रवचन,भजन व नऊदिवसांचा उत्सव आयोजित करण्यात येतो.
या बद्दलची दंतकथा अशी की इ.स. १८०० च्या काळात विदर्भ नगरीत नागपुर येथे विठोबा नावाचे गृहस्थ राहत होते, आपल्या संसारमय जीवनात पति पत्नी दोघांची श्रीरामा वर अपार श्रद्धा होती त्याना पुढे दोन मुले झाली एक लक्ष्मण तर दूसरा गोविन्द, गोविंद शांत व बालवयातच प्रभु प्रेमात मग्न असायचा त्याच्या या वैराग्य वृत्तीमुळे बालवयातच त्याचे लग्न करुण आई वडिलांनी त्याला संसारात टाकले परंतु लग्नानंतर तो अधिकच विरक्त झाला व त्याने घर सोडले तो रामनामाच्या घोषात हिमालयात गेला मुखात सतत देवाचे नामस्मरण करणारा गोविंद, एक सिध्द पुरुष किसनबुवा रामदासी हे समर्थ रामदासाचे शिष्य होते त्यांच्या चरणी लीन झाला तेथे त्याने तपश्चर्या केली, कंदमुळे,झाडपाला,फळे खाऊन १२ वर्षे तपात त्याला भगवान् श्रीरामांनी दर्शन दिले, पुढे गोविंद गुरु किसनबुवा कड़े गेला तेथे गुरुंच्या आदेशाने गोविंदने गृहस्थाश्रम स्विकारला व नागपुर येथे आल्यावर प्रभु रामांच्या दृष्टांताने नाशिक जिल्ह्यातील येवलवाड़ी येथे पूर्वीच्या काळी साधू संतांनी समाधि घेतल्या आहेत व येथील दंडकारण्यात वनवासात असतांना प्रभु रामचंद्र,बंधू लक्ष्मण,माता सितेने या भूमीवर विश्राम करुण दूस-या दिवशी नाशिक कड़े प्रस्थान केले असल्याने या पावन भूमित श्रीराम मंदिराची स्थापना केली.श्रीराम मंदिराची उभारणी झाल्या नंतर सिंहासन तयार झाल्यावर एके दिवशी गेंदूबुवा भक्तांसह मंदिराच्या बाहेर संत समागम करीत असतांना अकस्मात बैलगाड़ी येवून उभी राहिली व गेंदूबुवाना आवाज देऊन श्रीराम,लक्ष्मण,सितेसह मूर्ति दिल्या व आदेश दिला की,तुम्ही या मुर्तिंची प्राणप्रतिष्ठ करा,इतके सांगून बैलगाड़ी अदृश्य झाली, तेव्हा येवला येथे रामाचे मंदिर स्थापन झाले या मंदिरा साठी भक्तांनी सहकार्य केले.
आज हे मंदिर जागृत वनवाशी श्रीराम मंदिर या नावाने येवला शहराच्या गंगादरवाजा भागात दिमाखाने उभे आहे आजही रामनवमीच्या उत्सवास येथे हजारो भक्त दुरवरून येथे दर्शनास येतात, वनवासी श्रीराम मंदिरास जगदगुरु साईनाथ बाबा यांनी भेट दिली व येवल्याची भूमि पावन केली मंदिराचे पुजारी गेंदूबुवा व साईबाबा यांची भेट होऊन मंदिराची महती वाढविण्यास सांगितले. गोविंदाचीच पुढे गेंदूबुवा असे महती झाली भक्तानीच त्यांचे नाव गेंदूबुवा रामदासी असे ठेवले.

दरवर्षी वनवासी राम मंदिरात चैत्र शुक्ल प्रतिपदे पासून रामनवमी पर्यंत कथा,कीर्तन,महिला मंडलाच्या वतीने कथा,पुराण चालू असते येथे श्रीराममंदिरासमोरच हनुमानाचे मंदिर आहे तेथे ही हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो, हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो.
या वर्षी ही श्रीरामनवमीच्या निमित्ताने श्रीराम मंदिर संस्थान ट्रस्ट च्या वतीने सकाळी प्रभू श्रीरामचंद्रांचा मूर्तींचा महाभिषेक करण्यात येणार आहे व प्रभू श्री रामचंद्रांच्या जन्मावर आधारित प्रवचन ह.भ.प.डॉ.श्री प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांच्या सृश्राव्य वाणीतून श्रवण केली तसेच तसेच ओम गुरुदेव भजनी मंडळा कडुन भजनाचा कार्यक्रम तर महिला मंडळ पाळणा गीत सादर करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला त्या नंतर पंजेरीच्या प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, कार्यक्रम यशस्वीते साठी ट्रस्टचे पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर,प्रविण पहिलवान,सुहास घाटकर, प्रभाकर झळके,ज्ञानेश्वर नागपुरे,पुरुषोत्तम नागपुरे,राजेंद्र नागपुरे,जयंत नागपुरे,नारायण घाटकर,मुरलीधर नागपुरे,सुनील नागपुरे,सचिन नागपुरे,कृष्णा नागपुरे,बाळू नागपुरे,मंगेश बाकळे,किरण नागपुरे,आशा नानकर आदि परिश्रम घेत आहे.

साठी सचिन वखारे, येवला.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!