आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त खोची ते वडगाव प्रवाशांना रिक्षा सेवा मोफत
*आमदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त खोची ते वडगाव प्रवाशांना रिक्षा सेवा मोफत*
प्रतिनिधी :रोहित डवरी
महाराष्ट्राचे नेते आदरणीय हसन मुश्रीफ साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 30/3/2023 रोजी सकाळी 9 वाजता हनुमान मंदिर भेंडवडे येथे पेठ वडगाव ते खोची मोफत रिक्षा प्रवास शुभारंभ तसेच केक कापून आरती करून साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा उपाध्यक्ष हर्षवर्धन चव्हाण बोलताना म्हणाले राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब गोरगरीब कष्टकरी जनतेचा आधारवड कामगारांचा आधार निराधारांचा श्रावण बाळ सर्वांच्या साठी कायम उपलब्ध असणारा नेता यांच्यावर जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे हेतूने ईडीची कारवाई सुरू करण्यात आली आहे चुकीच्या पद्धतीने चाललेली कारवाई लोकशाहीचा खून करणारी आहे. संविधानाला संपवण्याची तयारी भाजपा सरकार कशा पद्धतीने करत आहे. अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेला भुलभुलय्या केलं महागाई वाढवली अडाणी अंबानी आदानीं यांना गलेलट्ट केलं टॅक्सचा बाजार सर्वसामान्यांच्या वर लादला आणि जे देशातले विरोधी पक्ष आहेत त्यांना पूर्णपणे संपवण्याचा विडा उचललेला आहे अशा प्रवृत्तीला गाडून टाकण्यासाठी आज हसन मुश्रीफ साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साहेबांना दीर्घायुष्य लाभो साहेबांच्या विरोधी चाललेल्या कारवाया यातून मुक्ती मिळो अशी भेंडवडे चे ग्रामदैवत हनुमानाची आरती राज्याचे संघटक सचिव मा.वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते आरती करून संकल्प करण्यात आला.
यावेळी पेठ वडगाव ते खोची एक दिवसीय प्रवासी वाहतुक युवक चे जिल्हाध्यक्ष रोहित पाटील यांच्या मार्गदर्शनाने रिक्षा प्रवास मोफत शुभारंभ करण्यात आला.
यावेळी आप्पासाहेब जाधव बाबुराव रोकडे सुनील पसाले अशोक एडके जयपाल भिसे सर्जेराव भिसे अतुल पाटील राजू मालगावे विनोद देसाई विठ्ठल निकम महावीर कांबळे शशिकांत माने विनोद चव्हाण भोपाल भिसे श्रेणिक देसाई विठ्ठल सुतार रमेश भिसे उत्तम निकम हनुमंत नरोटे करण चव्हाण संजय जंगम अरुण घोडके सतीश कोळी सचिन निकम महेश चव्हाण मोहन चव्हाण रोहित पाटील सचिन चव्हाण सुभाष खाडे विजय नांगरे
पांडुरंग नाईक चंद्रकांत कोळी अंकुश कोळी आदी मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते