माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सर्वांचा चांगला समाचार घेतला
प्रहार संघटनेच्या वतीने पाटोदा.ता येवला येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे रक्तदान शिबिर तसेच शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या बियाण्यांचे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी मधमाशी पालन प्रशिक्षणाची नाव नोंदणी करण्यात आली याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शरद भाऊ शिंदे अरुण भाऊ ठाकरे साहेब चांदवडचे गणेश निंबाळकर तसेच प्रवीण भाऊ गायकवाड आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षांचे व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रहार चे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा शेतकऱ्यांच्या अडचणी व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जो त्रास सहन करावा लागतो
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण ज्या लोकप्रतिनिधीना निवडून देतो ते प्रश्न न सोडविता भलत्याच उद्योगात मश्गुल असल्याने चळवळीतील कार्यकर्त्यांना घरची काम सोडून जनतेची काम करण्यासाठी प्रशासनाशी झगडावं लागतं
जसे विजेचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पाटपाण्याचे प्रश्न बी बियाण्याचे प्रश्न यावर प्रहार च्या वतीने वेळोवेळी आवाज उठवून आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देण्यात प्रहार नेहमीच अग्रेसर राहिली आहे तसेच शहरातील काही पतसंस्थांमधील गैरव्यवहारामुळे सर्वसामान्य हातावरच्या लोकांचे कष्टाचे पैसे त्यांना मिळवून देण्यासाठी जो लढा उभारला त्याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले किरण भाऊ यांनी प्रहार रत्न पुरस्काराचे मानकरी प्रवीण गायकवाड यांच्या बद्दल माहिती दिली व प्रहार रत्न पुरस्काराचे स्वरूप याबद्दल माहिती दिली. अल्पसंख्यांक समाजातील अडचणी व व्यथा याबद्दल मनोगत अजहर शहा यांनी व्यक्त केले गणेश निंबाळकर यांनी पालखेड कालवा व दरसवाडी धरण याबद्दल सविस्तर माहिती व तालुक्यातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ कसा आहे याबद्दल सविस्तर माहिती दिली तीन पिढ्यांपासून सुरू असलेल्या लढ्याला आज कोणीतरी श्रेय घेत आहे ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे स्थानिक गरजू शेतकरी यांचा विचार न करता काही मोजके लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी श्रेय लाटण्यासाठी मतदार संघातील लोकांची दिशाभूल करतात अशा व्यथा मांडल्या माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांनी आपल्या अध्यक्ष भाषणात सर्वांचा चांगला समाचार घेतला माझ्यावर आरोप करणारे जरा विचार करा कोणतीही गोष्ट सहज होत नाही आम्ही गद्दार नाही बंडखोर आहोत आणि हा बंड एक विशेष मक्तेदारीच्या विरुद्ध होता स्वतःच्या स्वाभिमानासाठी होता आणि सर्वसामान्य शेतकरींसाठी होता कारण तुमचा पालखेड पुणे गाव दरसवाडी धरणाचा प्रश्न हा तीन पिढ्यांपासून चालत आलेला आहे मी तुम्हाला शब्द देतो लवकरच तुमचा हा प्रश्न मार्गी लावेल जिथे जिथे जेव्हा जेव्हा सर्वसामान्य गोरगरीब माझा अपंग बांधव माझा शेतकरी बांधव अडचणीत येईल तेव्हा तेव्हा हा बच्चू कडू तुमच्यासाठी जीवाचं रान करण्यासाठी तयार आहे आज पर्यंत जेव्हड्या केस मी अंगावर घेतल्या आहेत त्यातील एकही केस माझ्या स्वतःसाठी नाही सर्व काही सर्वसामान्यांसाठीच होतं आणि पुढेही चालू राहील येवले शहरातील तालुक्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील ज्या समस्या प्रहारच्या माध्यमातून माझ्यासमोर येतील त्यांना उत्तमरीत्या पूर्ण करण्याचा मी शब्द देतो व लवकरच या सर्व निवेदनांचा मागण्यांचा मी निपटारा करेल असे आश्वासन माजी राज्यमंत्री बच्चू भाऊ यांनी दिले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख दत्तू भाऊ बोडके जिल्हाप्रमुख शरद भाऊ शिंदे उपजिल्हाध्य गणेश भाऊ निंबाळकर तालुकाप्रमुख हरिभाऊ महाजन प्रहार संघटना सुनील भाऊ पाचपुते युवा आघाडी तालुकाप्रमुख किरण चरमळ बापूसाहेब शेलार रामभाऊ नाईकवाडे वसंत झांबरे अमोल तळेकर ज्ञानेश्वर वाघ शिवनाथ ठोबरे संजय मेंगाने बाळासाहेब बोराडे गणेश बोराडे श्याम मेंगणे दत्तू बोरणारे बापू बोरणारे श्रावण बोराडे जनार्धन गोडसे मंगेश आढाव दादासाहेब शेटे समाधान शेटे धनंजय खरोटे गणेश कुंभकर्ण दीपक राजगुरू देवमन शेलार बापू कानडे विपुल कानडे सुभाष कानडे एकनाथ जाधव किशोर भोसले सचिन उगले बापू शेटे दत्तू शेटे सोमनाथ भुसारे साईनाथ दिवटे आदींनी परिश्रम घेतले