ताज्या घडामोडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप*

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला शहरातील पूरग्रस्त नागरिकांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप*

*येवला,दि.२७ मार्च:-* येवला शहरात अतिवृष्टीमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. या अतिवृष्टी बाधित कुटुंबीयांना आज राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवला संपर्क कार्यालय येथे २० लाभार्थी कुटुंबीयांना प्रत्येकी १० हजार रुपयांच्या मदतीचे वाटप करण्यात आले.

येवला शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून बाधित नागरिकांना तातडीने मदत पोहचविण्यात आली होती. तसेच पूरग्रस्त परिसराची पाहणी करत त्यांना मदत देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या होत्या. त्यानंतर प्रस्तावांची पूर्तता करून शासनामार्फत आज बाधित नागरिकांना मदत देण्यात आली.

यावेळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी नागेंद्र मुत्केकर, नायब तहसीलदार श्रीमती पंकजा मगर, अभियंता जनार्दन फुलारी, विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, शहराध्यक्ष दिपक लोणारी, माजी जिल्हा परिषद सदस्य सभापती संजय बनकर, सचिन कळमकर, मकरंद सोनवणे, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर, तहसील विभाग व नगरपालिकेचे श्री.सदावर्ते, श्री.भावे, श्री. मिटकरी यांच्यासह पदाधिकारी, अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!