ताज्या घडामोडी
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून वीरजवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन*
*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून वीरजवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन*
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज मानोरी येथे वीरजवान अजित गोरख शेळके यांच्या कुटुंबीयांची सांत्वनवर भेट घेतली. यावेळी छगन भुजबळ यांनी शेळके कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच वीरजवान अजित शेळके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी विधानसभा अध्यक्ष वसंत पवार, तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, माजी जिल्हा परिषद सभापती संजय बनकर, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब गुंड, नवनाथ काळे, सरपंच नंदलाल शेळके, देवराम शेळके, सदाभाऊ शेळके, लहानु शेळके, भाऊसाहेब धनवटे, सुनील पैठणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.