. कैंजन संघवी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून पी.एच.डी. पदवी प्राप्त*
*प्रा. कैंजन संघवी यांना मराठवाडा विद्यापीठाकडून पी.एच.डी. पदवी प्राप्त*
पोलीस टाईम्स न्यूज/ सुनिलआण्णा सोनवणे
*चांदवड* : येथील नॅक मानांकीत “ अ ” दर्जाचे श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचालित स्व. सौ. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शाखेच्या विभाग प्रमुख प्रा. कैंजन महेश संघवी यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून नुकतीच कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग विषयातून पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी “’डिझाईन ऑफ इफेक्टिव्ह टेक्निक्स फ़ॉर प्रिव्हेन्शन अँड डिटेक्शन ऑफ ग्रेप डीसीस ऍट रियल टाईम युसिंग लॉट अँड इमेज प्रोसेसिंग'” या विषयावर संशोधन कार्य केले आहे.
द्राक्ष बागेवर येणाऱ्या खोडकिड वर त्याचे संशोधन अतिशय उपयुक्त असून.
या संशोधनाचे त्यांनी पेटंट देखील दाखल केले आहे.
सोबतच या बहुमोल संशोधना बद्दल त्यांना
The Confederation of Indian Industry (CII) कडून platinum संशोधक हा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे.
या संशोधना साठी डॉ़ अर्चना राजुरकर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी एस.जी. जी. एस. इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विष्णुपुरी नांदेड या संशोधन केंद्रातून अभ्यासक्रम पूर्ण केला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी. ताथेड, उपप्राचार्य डॉ. एम.आर.संघवी यांनी अभिनंदन केले.
प्रा. कैंजन महेश संघवी यांच्या यशाबद्दल संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती, विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे समन्वयक दिनेशकुमार लोढा, सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंदकुमार भन्साळी, तसेच प्रबंध समितीचे सहमानद सचिव व महाविद्यालयाचे समन्वयक झुंबरलाल भंडारी व सुनीलकुमार चोपडा आदींसह सर्व विश्वस्त मंडळ व सर्व प्रबंध समितीचे सदस्य आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या.