ताज्या घडामोडी

माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्यानंतर येवल्यातील स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकाला गती*

*माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांच्या पाठपुराव्यानंतर येवल्यातील स्वातंत्र्य सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकाला गती*

*स्वा.सेनानी तात्या टोपे स्मारकास १ कोटी ५७ लक्ष रुपयांचा राज्य शासनाचा हिस्सा वितरित करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आदेश*

*नाशिक,दि.२४ मार्च:-* राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून स्वा.सेनानी तात्या टोपे यांच्या स्मारकास राज्य शासनाचा १ कोटी ५७ लक्ष रुपयांचा हिस्सा वितरित करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे. त्यामुळे रखडलेल्या या कामाला आता गती मिळणार आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या पहील्या संग्रामातील तात्या टोपे हे एक प्रमुख सेनानी होते. त्यांच्या अतुलनिय त्यागाने व शैर्याने भारतीय स्वांतत्र्याच्या इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय लिहिला गेलेला आहे. त्यांचा हा इतिहास स्मरणात राहावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीमधून येवला येथे त्यांचे स्मारक विकसित करण्यात येत आहे. या स्मारकाचे काम निधी अभावी बंद पडले होते. यासाठी छगन भुजबळ यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक कार्य मंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

स्वा.सेनानी तात्या टोपेंच्या मुळ गावी म्हणजे येवला येथे नगर परीषदेच्या मालकीच्या स. न. ४९ व ५० बाभुळगाव खु.येथे त्यांचे स्मारक उभारण्याच्या सुमारे १०.५० कोटी रकमेच्या कामास केंद्र शासनाच्या सांस्कृतीक कार्य विभागाने यापूर्वीच मान्यता दिलेली आहे. यासाठी केंद्र शासन ७५ टक्के, राज्य शासन १५ टक्के व नगर परिषद १० टक्के निधि उपलब्ध करुन देणार असल्याचे निश्चित झालेले आहे. यानुसार केंद्र शासनाने त्यांच्या हिश्श्याच्या ७.८८ कोटी पैकी ३.९४ कोटी म्हणजे अर्धा निधी उपलब्ध करुन दिलेला आहे. सदर स्मारकाचे काम प्रगतीपथावर असून उपलब्ध निधी पैकी रक्कम रु. ३.९२ कोटी या कामासाठी खर्च करण्यात आलेले असून उर्वरीत कामासाठी निधीची आवश्यकता होती. त्यासाठी राज्य हिस्सा रक्कम रु. १.५७ त्वरीत उपलब्ध करुन देण्यात यावा असे आदेश प्रधान सचिव आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

स्वा.सेनानी तात्या टोपे यांच्या या स्मारकात स्मृती उद्यान बांधण्यात येणार आहे. सदर उद्यानात माहिती केंद्र, शिल्पकृती, गॅलरी, प्रदर्शन हॉल, वाचनालय, ऑडिओ व्हिज्युअल हॉल, प्रतिकात्मक शिल्प गार्डन, लेझर शो, कॅफेटेरिया, बगीचा, चिल्ड्रन पार्क, पार्किंग इत्यादी बाबींचा समावेश आहे.

Share

Chief Editor Kazi Salim Allauddin 9850140788 येवलाco Chif Editor DR. Bharat Devalekar Sarkar Mumbai +919004737999

आमचे आपल्या साठी अमुल्य प्रकाश poicetimes.co.in

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!