ब्रह्माकुमारीज तर्फे नारीशक्ती पुरस्कार प्रदान प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येवला यांच्या वतीने पटेल कॉलनी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रामध्ये जागतिक महिला दिन साजरा

ब्रह्माकुमारीज तर्फे नारीशक्ती पुरस्कार प्रदान
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा येवला यांच्या वतीने पटेल कॉलनी ब्रह्माकुमारी सेवाकेंद्रामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.या महिला दिनाचे औचित्य साधत या ठिकाणी सुंदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांनी चूल व मूल ही जबाबदारी सांभाळताना आपण आणखीही समाजाचे काही देणे लागतो अशी जाणीव ज्यांच्यात आहे अशा काही कर्तबगार समाजसेवी महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या नाशिक परिसर वृत्तपत्र तसेच ब्रह्माकुमारीज यांच्या संयुक्त विद्यमाने नारीशक्ती 2023 या पुरस्काराने सर्व महिलांना सन्मानित करण्यात आले.शॉल, गुलाबपुष्प,मानाचा फेटा.सर्टिफिकेट,सन्मान चिन्ह,नाशिक परिसर वृत्तपत्र,शिव आमंत्रण संदेश पत्रिका तसेच ईश्वरीय प्रसाद देऊन सर्वांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ.ज्योती कावरे मॅडम प्रांताधिकारी येवला तसेच श्री प्रमोद हिले साहेब तहसीलदार येवला तालुका,सौ.सुरेखा नरेंद्र दराडे माजी सभापती शिक्षण व आरोग्य विभाग जिल्हा परिषद नाशिक, डॉ.श्री. भाऊसाहेब गमे प्राचार्य जनता महाविद्यालय,नमन एज्युकेशन व रेम्बो इंग्लिश मीडियम स्कूल चे डायरेक्टर श्री संजय बागुल तसेच सौ.शैलाताई कलंत्री माहेश्वरी समाज माजी संघटन मंत्री,उषाताई शिंदे माजी नगराध्यकक्षा,आपलं महानगरचे पत्रकार श्री.प्रसाद गुब्बी हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते.याव्यतिरिक्त येवला शहरातून 24 कर्तबगार समाजसेवी आदर्श महिलांची निवड करण्यात आली होती यात राजकीय,सामाजिक,शैक्षणिक पैठणी उद्योजिका, विविध समाजाच्या महिला अध्यक्ष,सरकारी अधिकारी अशा महिलांचा समावेश होता या कार्यक्रमासाठी येवला नर्सिंग कॉलेज पारेगाव रोड येथील जवळपास 100 विद्यार्थिनींनी ही सहभाग नोंदविला तसेच ब्रह्माकुमारीचे साधकही मोठ्या संख्येत उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचा आत्मिक स्मृतीचा तिलक गुलाब पुष्प व शाल देऊन स्वागत करण्यात आले. दीप प्रज्वलनानंतर कु.प्रज्ञा गरुड हिने महिला दिनाविषयी सुंदर विचार मांडले.सौ.ज्योती कावरे मॅडम यांनी आजची महिला आजचे चॅलेंजेस आणि ऐतिहासिक महिला या कशा आजही आदर्श आहेत याविषयी प्रकाश टाकला शिक्षणाविषयीची जागृती,स्त्री पुरुष समानता,बेटी बचाओ यावर विशेष भर दिला.नारीशक्ती 2023 हा पुरस्कार सौ.ज्योती कावरे मॅडम,सौ.हेमलता प्रमोद हिले उपआयुक्त मालेगाव महानगरपालिका,सौ सुरेखा नरेंद्र दराडे, सौ.शैला कलंत्री सौ.उषाताई शिंदे,डॉ.सौ.रश्मी प्रसाद गुब्बी,सौ.सरिता संजय बागुल,सौ.कुसुम बनकर सौ.सविता बाळासाहेब पवार,सौ.शैलाताई कलंत्री,एड. सौ.कविता पराते,सौ.रूपाली महेश शेटे,सौ.विष्णूकांता अट्टल,सौ.कुसुम रामेश्वर कलंत्री,सौ.भारती पाटील,सौ विजया सोनवणे, दुगलगाव सरपंच सौ.आशाताई रावसाहेब लासुरे,कु.अंकिता मानेकर,कु.शुभांगी रमेश सोनवणे,सौ.मंगल सुनील लक्कडकोट,सौ.मनीषा राजू गुंजाळ,सौ.ज्योति श्रीकांत खंदारे,सौ.सोनाली स्वप्नील घोडके,कु.मयुरी राधाकिसन वनवे,कु.सृष्टी एकनाथ भाबड, येवला नर्सिंग कॉलेजच्या कु.शांती बडवे मॅडम,कु.श्रद्धा अहिरे मॅडम,कु.अश्विनी जाधव मॅडम या विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजयोगिनी ब्रह्माकुमारी नीता दीदी येवला सेवाकेंद्र संचालिका तसेच आभार प्रदर्शन ब्रह्माकुमारी अनुदिदी यांनी केले नाशिक परिसर वृत्तपत्राचे प्रतिनिधी हे याप्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आलेल्या सर्व श्रोता महिलांसाठी लकी ड्रॉची बक्षीस ही देण्यात आली.