H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची यंत्रणा सुसज्ज ठेवणे संदर्भात निवेदन देण्यात आले.
H3N2 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयाची यंत्रणा सुसज्ज ठेवणे संदर्भात निवेदन देण्यात आले.
पोलीस टाईम्स नांदगाव तालुका प्रतिनिधी.आफरोज अत्तार.
शिवसेना मनमाड शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली मनमाड शहर शिवसेना तर्फे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुसज्ज राहावे असे निवेदन देण्यात आले.
आपल्या जिल्ह्यात इन्फ्लुएंजा व्हायरस नवीन स्वरूपात पसरत असून त्याचे लक्षण असलेले रुग्ण आपल्या शहर परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे, तसेच खाजगी दवाखाने व मेडिकल स्टोअर्स मध्ये गर्दी दिसून येत आहे, याची लक्षणे बहुतांश कोरोना प्रमाणेच असल्याने याविषयी जनतेमध्ये संभ्रम व भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याने याला आळा घालण्यासाठी संभाव्य धोका टाळण्यासाठी आपल्या हॉस्पिटलची संपूर्ण यंत्रणा तसेच पुरेसा औषध साठा सुसज्ज ठेवावे व काळजीपूर्वक लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी असे निवेदन यावेळी देण्यात आले.
या प्रसंगी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे, विधानसभा संघटक जाफर मिर्झा, शहर उपप्रमुख मुकुंद झालटे रुग्ण कल्याण समितीचे महेंद्र गरुड, दिनेश घुगे, शिवसेना शहर सचिव निलेश ताटे,जयेश शस्त्रबुद्धे, प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते